- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC)पूर्व प्रशिक्षण तसेच जिल्हा निवड समितीच्या विविध पदभरती आणि बँकिंग निवड संस्था(IBPS- Institute of Banking Personnel Selection)स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC) परीक्षांसाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने शालांत परीक्षा (१० वी/१२वी) उत्तीर्ण असणे आवश्यक असून,त्यांच्याकडे रोजगार नोंदणी कार्ड (Employment Card) असणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महिने असून,प्रशिक्षण कालावधीत दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे.प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
अर्ज विनामूल्य उपलब्ध असून,उमेदवारांनी १ मार्च ते २७ मार्च २०२५ या कालावधीत अर्ज भरून सादर करावा.त्यानंतर २८ मार्च रोजी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल,बॅरक क्र.२,गडचिरोली येथे मुलाखत घेण्यात येईल.अधिक माहितीसाठी ८४८५८१४४८८ (8485814488) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.
- Advertisement -