Wednesday, June 24, 2026
Homeपवनीवाघाने दुचाकीवर चढवला हल्ला; महिला शेतकरीच्या  हाताचे लचके तोडून केले जखमी…

वाघाने दुचाकीवर चढवला हल्ला; महिला शेतकरीच्या  हाताचे लचके तोडून केले जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पवनी(भंडारा) :-शेतात मशागतीच्या कामावरून पतीसोबत दुचाकीने परत येत असताना शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे दुचाकीवर हल्ला केला.यात शेतकरी महिला जखमी झाल्याची खळबळजनक घटना पवनी तालुक्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रातील  चिचाळ चकारा पुलाजवळ घडली.सूर्यकांता गोपाल काटेखाये वय ४० वर्षे,रा.चिचाळ असे या जखमी महिलेचे नाव आहे.

अड्याळ-चिखली येथील शेती मशागतीची कामे सुरू आहेत.चिचाळ येथील गोपाल काटेखाये यांची शेती असून,शेती मशागतीची कामे आटोपून पती गोपाल काटेखाये सोबत दुचाकीने येत असताना अड्याळ चिचाळ मार्गावरील पुलाशेजारी दबा मारून बसलेली वाघाने दुचाकीवर हल्ला चढविला.यात सूर्यकांता ही खाली कोसळली. यात वाघाने तिच्या डाव्या पायावर व डाव्या हाताचे लचके तोडून जखमी केले.पतीने आरडाओरड केल्याने रस्त्याने जाणाऱ्यांनी वाघाच्या 

दिशेने धाव घेतली.त्यानंतर वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला.गंभीर जखमी झालेल्या सूर्यकांताला ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे नेण्यात आले.घटनेची माहिती मिळताच वनविभाग अड्याळचे वनक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे कर्मचाऱ्यासह पोहोचून घटनास्थळाचा व ग्रामीण रुग्णालयात सूर्यकांता काटेखाये यांची भेट देऊन पंचनामा केला.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.सध्या शेतीच्या मशागतीचा काळ आहे.अशा दिवसात हा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांनी सुरक्षेची मागणी वन विभागागाकडे केली आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!