Sunday, May 17, 2026
Homeगडचिरोलीलॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी तर्फे वस्त्र उद्योग व  प्रशिक्षण केंद्र...

लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी तर्फे वस्त्र उद्योग व  प्रशिक्षण केंद्र हेडरी येथे जागतिक महिला दिवस साजरा – महिला दिनानिमित्त मनोरंजनात्मक विविध खेळांचे आयोजन 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड वस्त्र उद्योग व प्रशिक्षण केंद्र हेडरी येथे महिला दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.पुरातन काळापासुनच स्त्रीला अनन्य साधारण महत्व असुन स्त्री ही अनंत काळाची माता आहे असे संबोधीले जाते.या उक्तीस अनुसरुन ८ मार्च हा दिवस जागतीक महिला दिन म्हणुन राज्यात सर्वत्र साजरा केला जातो.सदर महिला दिनाचे औचित्य साधुन शालेय मुली,महाविद्यालयीन युवती व सर्व महिलांध्ये तंदुरुस्ती व आरोग्य या बाबत जागृकता निर्माण करण्याकरीता मुलींना अधिकाअधिक क्रीडा विषयक सोई सुविधा,मोकळे वातावरण,कौशल्याची संधी,मुलींच्या आरोग्य न्युट्रेशन, योग्य सवयी उपलब्ध करुन दिल्यास स्त्रीयांची पर्यायाने कुटुंबाची सुधारणा होऊन सशक्त समाज उभा राहील.

कार्यक्रमाचे उदघाट्न सफाई कर्मचारी सुशीला तोरे, सुनीता आत्राम यांचे शुभ हस्ते करण्यात आला.सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे महिलांना प्रशिक्षनार्थी महिलांना, युवतींना,स्वागत करून पुष्प गुच्छ देऊन सत्कार कारण्यात आला.त्यानंतर भाषण,संस्कृती स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,चमचा गोळी,मटका पोडी,संगीत खुर्ची इत्यादी मनोरंजनात्मक स्पर्धा आयोजन करण्यात आला.स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार करून बक्षीस वितरण करण्यात आले.

जागतिक महिला दिना विषयी प्रज्ञा वाघमारे यांनी अति मोलाचे मार्गदर्शन केले.या वेळी उपस्थित स्नेहा सोनवणे,शेवंता गोटा,कल्पना बोमंवार,शिवानी करमारकर,अर्चना बनकर,माधवी नालीवर,गणेश शेट्टी, डॉ.गोपाळ रॉय, सर्व मंचवार उपस्थित मान्यवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.वस्त्र उद्योग व  प्रशिक्षण महिला, युवतींनी कार्यक्रमाचे स्वतःहून आयोजन करून अति उत्तम कामगिरी करून यशस्वीरीत्या पार पाडले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भाजप नेत्याच्या मुलाचा मृतदेह आढळला तलावात; परिसरात तणावपूर्ण वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खापरखेडा-नांदा मार्गावरील तलावात भाजप नेते रमेश लोढे यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सचिन रमेश लोढे वय ३७ वर्षे,रा.वॉर्ड...

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम केला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे.घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीपासून...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थींसाठी सुधारित वेळापत्रक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा आता येत्या,रविवार २८ जून २०२६ रोजी होणार...

ठाणेगाव परिसरात वणव्याचे रौद्ररूप; शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू.. – आमदार रामदास मसराम शेतबांधावर..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव परिसराच्या शेतशिवारात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण करून परिसरातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.काहींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!