उद्रेक न्युज वृत्त
नाशिक :- राज्य परिवहन महामंडळाच्या गलथान कारभारामुळे नाशिकच्या नांदगाव येथील एका कुटुंबातील मुलाच्या लग्नाचा मुहूर्त टळला.नांदगाव येथील सतीश बिडवे यांचे मुलाचे लग्न संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात बाबरा येथील तरुणीसह ठरले होते.सहलींसह विविध समारंभांसाठी एसटी बसेस भाडेतत्वावर दिल्या जातात.बिडवे यांनी लग्न सोहळ्यासाठी वऱ्हाडींना घेवून जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नांदगाव आगाराची बस प्रासंगिक कराराने बुक केली होती.आगाराने चालकाला चुकीचा पत्ता दिल्याने बस नांदगाव ऐवजी नस्तनपूर येथे पोहचली.यामुळे बस चुकीच्या मार्गावर गेल्यामुळे नियोजित वेळेपेक्षा बस एक तास उशिराने निघाली.साधारण ५० किलोमीटर अंतर गेल्यावर बस रस्त्यातच बंद पडली.यामुळे वऱ्हाडी संतापले.बस दुरुस्त करण्यासाठी अडीच तिथेच ताटकळत बसावे लागले.अडीच तासा नंतर पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला.यानंतर पर्यायी बस उपलब्ध करुन देण्यात आली.या सगळ्या वेळात लग्नाचा मुहूर्त निघून गेला.लग्नाचा मुहूर्त चुकल्याने बिडवे परिवारासह वऱ्हाडी मंडळीना मनस्ताप सोसावा लागला तर नवरदेवाची वाट पाहू-पाहू नवरी दमली होती.बसच्या गलथान कारभारामुळे लग्नाचा मुहूर्त ही गेला आणि सर्वांना मनस्ताप सोसावा लागला.