Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीराष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मोफत अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत मोफत अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली:- राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचे १६ मार्च ते ३१ मार्च २०२३ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.संचालक आरोग्य सेवा पुणे यांचे आदेशान्वये मोहिम स्वरुपात राज्यभरात अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचाच एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यात १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२३ या दरम्यान हत्त्तीरोग आणि अंडवृद्धी सर्वेक्षण यादीला अनुसरून १५ मार्च २०२३ रोजी अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

सदर मोहिम यशस्वी होण्याच्या दृष्टीकोनातून आरोग्य उपकेंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय अंडवृद्धी रुग्णाची यादी तयार करून व वैद्यकीय अधीक्षक यांचे मार्फत तपासणी केल्यानंतर अंडवृद्धी शस्त्रक्रियेस पात्र रुग्णाची यादी तयार करण्यात आली असून जिल्हा सामान्य रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे तज्ञ डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अंडवृद्धी शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना कोणतीही फी आकारली जाणार नसून संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत होणार आहे.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी या शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेऊन आपले जीवन सुकर करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ.अनिल रुडे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दालनात हत्तीरोग निरीक्षक आढावा सभेत केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!