Saturday, June 27, 2026
Homeयवतमाळमुलगी आयएएस झाल्याचा आनंदोत्सव साजरा करतांना वडिलांना हृदयविकाराचा झटका..

मुलगी आयएएस झाल्याचा आनंदोत्सव साजरा करतांना वडिलांना हृदयविकाराचा झटका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
यवतमाळ :-आपल्या मुलीने मोठे अधिकारी व्हावे,अशी स्वप्ने रंगवू पाहणाऱ्या वडिलांची इच्छा मुलीने पूर्ण केली. त्यासाठी घरी मोठी पार्टी आयोजित करण्यात आली. अशातच मुलगी आयएएस झाल्याचा आनंदोत्सव साजरा करतांनाच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. झटका येताच उपस्थित नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.मात्र,तोपर्यंत प्राणज्योत मावळली.प्रल्हाद खंदारे असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे.खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते.सदरची घटना यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथे घडली असून घटनेने ऐन आनंदोत्सवावर दुःखाचे सावट पसरले आहे.
नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी हिची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या(यूपीएससी)परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकरी म्हणून निवड झाली.मुलगी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी झाल्याचा आनंदोत्सव खंदारे परिवाराकडून साजरा केला जात असतांनाच प्रल्हाद खंदारे यांना हृदयविकाराचा झटका आला.त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.सदरच्या घटनेने खंदारे कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!