Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीमाता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. समितीमार्फत या प्रकरणातील सर्व संबंधित बाबींची सविस्तर तपासणी करण्यात येत असून,चौकशी अहवालातील निष्कर्षांनुसार नियमानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी दिली.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, जिजा हंसराज सातार वय २७ वर्षे,रा.चामोर्शी, जि.गडचिरोली यांना काल रविवार २३ ऑगस्ट रोजी प्रसूतीसाठी सकाळी ५ वाजता ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे दाखल करण्यात आले होते.तेथील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत सुरुवातीला प्रसूती ग्रामीण रुग्णालयात होणे शक्य असल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर सकाळी सुमारे ९ वाजता करण्यात आलेल्या पुढील तपासणीत स्वाभाविक प्रसूतीस अडचणी निर्माण होत असल्याचे तसेच प्रसूती गुंतागुंतीची होण्याची शक्यता असल्याचे आढळून आले.गर्भातील बाळाच्या हृदयाचे ठोके मंद असल्याचेही निदर्शनास आल्याने गर्भवती मातेस पुढील विशेष उपचारासाठी सकाळी ११ वाजता महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे संदर्भित करण्यात आले. संदर्भनादरम्यान रुग्णवाहिकेसोबत वैद्यकीय अधिकारी व परिचारिका उपस्थित होते.
महिला व बाल रुग्णालय,गडचिरोली येथे तपासणी केली असता मातेची प्रकृती गंभीर व गुंतागुंतीची असल्याचे तसेच बाळाचे डोके अडकल्याची स्थिती असल्याचे आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.त्यामुळे तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचारांतर्गत प्रसूती करण्यात आली.मात्र, त्यावेळी बाळ मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले.
प्रसूतीनंतर मातेला अतिरक्तस्राव सुरू झाल्याने तिची प्रकृती अधिक गंभीर झाली.संबंधित तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आवश्यक उपचार करण्यात आले.रुग्णास रक्त तसेच चार युनिट एफएफपी(फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा)देण्यात आले.
उपचारादरम्यान रुग्णाची प्रकृती आणखी खालावल्याने तिला इंट्यूबेशन करण्यात आले.पुढील विशेष उपचारासाठी सायंकाळी ७.३० वाजता सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले.तेथे वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत आवश्यक उपचार तसेच सोनोग्राफी करण्यात आली.मात्र, उपचारादरम्यान रात्री ९.५० वाजता मातेचा मृत्यू झाला.
या प्रकरणातील संपूर्ण घटनाक्रम व संबंधित बाबींची चौकशी समितीमार्फत तपासणी करण्यात येत आहे. चौकशी अहवाल लवकरच सादर करण्यात येणार असून,त्यातील निष्कर्षांनुसार नियमानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल,असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!