Monday, August 17, 2026
Homeआसामपोलीसांनी दरोडेखोर समजून केले एनकाउंटर; डीएनए विश्लेषण केल्याने निघाला भलताच

पोलीसांनी दरोडेखोर समजून केले एनकाउंटर; डीएनए विश्लेषण केल्याने निघाला भलताच

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गुवाहाटी :- आसाममधील उदलगुरी जिल्ह्यात पोलिसांनी चुकीच्या ओळखीच्या आधारे एका व्यक्तीला दरोडेखोर समजून त्याचे एनकाउंटर केले.गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात रविवारी याबाबत पुष्टी झाली.चकमकीत मारला गेलेला व्यक्ती दरोडेखोर केनाराम बोरो उर्फ केनाराम बसुमातारी हा नसून त्याचे नाव डिंबेश्वर चहा असल्याचे तपासात समोर आले आहे.तो एक शेतकरी असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.परंतु पोलिसांचा दावा आहे की,तो सराईत गुन्हेगार होता.रौता भागातील धनसिरीखुटी गावात २४ फेब्रुवारीला झालेल्या चकमकीत दोन पोलिस जखमी झाले. बोरोच्या आईने हा मृतदेह आपल्या मुलाचा असल्याचे ओळखल्यानंतर मृतदेह तिच्या ताब्यात देण्यात आला.

यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पोलिस महासंचालकांना सीआयडी चौकशीचे आदेश देण्याचे निर्देश दिले.घटनेची २ मार्चपासून चौकशी सुरू करण्यात आली.पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सदर मृतदेह बाहेर काढून त्याचे डीएनए विश्लेषण करण्यात आले.यात हा मृतदेह बोरोचा नसून मुचाहारीचा असल्याचे समोर आले.तपास अहवाल लवकरच सरकारला सादर करण्यात येणार असून मृतदेह मुचाहरी यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.दुसरीकडे, पोलिसांनी आपल्या मुलाची हत्या दरोडेखोर असल्याच्या संशयावरून केल्याने आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी मुचाहरीच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!