Monday, August 17, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली येथे आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

गडचिरोली येथे आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-  जिल्हा नियोजन समिती भवन गडचिरोली येथे आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ व PMFME योजने अंतर्गत जिल्हा स्तरीय कार्यशाळाचे आयोजन जिल्हाधिकारी संजय मीणा, यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.सदर कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी,धनाजी पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि प, राजेंद्र भुय्यार, जिल्हा प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक,युवराज टेम्भुणे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी अहेरी, आनंद गंजेवार हे उपस्थित होते. धनाजी पाटील यांनी जिल्ह्यात पीक क्षेत्र वाढविण्याबरोबर त्याची विक्री व पौष्टिक तृणधान्य ची भाकर व इतर पदार्थ खाणारा वर्ग तयार करावा व विशेषतहा ज्या भागात भाकरी खाण्याचा प्रमाण जास्त आहे त्या भागात प्रशिक्षण सहल आयोजित करावे असे सांगितले. राजेंद्र भुय्यार यांनी  जिल्हा परिषद विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजना अंतर्गत पोषणमुल्य वाढविण्यावर भर देऊन मुलांच्या आहारात पोषक असे पौष्टिक  तृणधान्य चे समावेश करण्याचे नियोजन करू असे आश्वासन देण्यात आले.बसवराज मास्तोळी यांनी पौष्टिक तृणधान्य यांचे महत्व सांगितले व स्थानिक पीक कोदो क्षेत्र वाढ  करण्याचे आव्हान केले. पौष्टिक तृणधान्य क्षेत्र वाढीबरोबर विक्री व्यवस्था चे नियोजन करणार असल्याचे सांगितले. PMFME योजने अंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योग उभारणी आर्थिक सहायता चा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले. तसेच जिल्ह्यात नावीन्य पूर्ण बाब स्ट्रबेरी उत्पादित झालेली  स्ट्रबेरी मान्यवरांना खाण्याचा योग बसवराज मास्तोळी यांनी जुळवून आणला.

कार्यशाळेत पौष्टीक तृणधान्य वर आधारित भोजनाचे नियोजन करण्यात आलेले होते त्यात बाजरी ची भाकर,नाचणीची आंबील,भगर,भात,इत्यादी पदार्थ होते.सदर कार्यशाळेस उपस्थित उपविभागीय कृषी अधिकारी व  तालुका कृषी अधिकारी हे उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्र संचालन आनंद गंजेवार  यांनी केली व पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 याचे संपूर्ण वर्षाचे नियोजन त्यांनी सांगितले व तृणधण्याचे अनन्य साधारण महत्व उत्तमरित्या पटवून दिले तसेच पौष्टिक तृणधान्य मध्ये असलेले प्रथिने व त्यापासून आपण कुठल्या रोगांपासून  बचाव करू शकतो याची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचा समारोप करतेवेळी बसवराज मास्तोळी यांनी जिल्हा स्तरीय समिती सदस्यांना “आंतराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्याकरिता विनंती व सभेस हजर राहिल्या बद्दल आभार व्यक्त केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!