Sunday, May 17, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील गरीब,गरजू मुला-मुलींचे होणार सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा - विवाह सोहळा...

गडचिरोली जिल्ह्यातील गरीब,गरजू मुला-मुलींचे होणार सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा – विवाह सोहळा समिती गठीत करण्यास संपर्क साधण्याचे आव्हान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- धर्मादाय आयुक्त,म.रा.मुंबई यांचे वतीने यंदा गडचिरोली जिल्हयातील आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शहीद जवान, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या इसमांची मुले, बेघर, पारधी समाज, गरीब गरजू, ऊसतोड कामगार,भटक्या जमाती, विमुक्त जाती,अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय यांची मुले-मुली व अनाथ मुले-मुली इत्यादींचे विवाह सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती,गडचिरोली यांचे मार्फत १ फेब्रुवारी ते ३१ मे २०२३ या कालावधीत आयोजित करणे आहे. करीता सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा समिती,गडचिरोली समिती गठीत करणेकरीता गडचिरोली जिल्हयातील धर्मादाय संस्था न्यास यांचे विश्वस्त व वकील यांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, गडचिरोली बॅरेक क्र.२, जिल्हा जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ संपर्क साधावा.समिती गठीत झाल्यानंतर उपरोक्त गरीब-गरजु मुला-मुलीचे विवाह हया समिती मार्फत करण्यात येईल असे सहाय्यक धर्मादाय आयुक्त गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भाजप नेत्याच्या मुलाचा मृतदेह आढळला तलावात; परिसरात तणावपूर्ण वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खापरखेडा-नांदा मार्गावरील तलावात भाजप नेते रमेश लोढे यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सचिन रमेश लोढे वय ३७ वर्षे,रा.वॉर्ड...

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम केला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे.घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीपासून...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थींसाठी सुधारित वेळापत्रक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा आता येत्या,रविवार २८ जून २०२६ रोजी होणार...

ठाणेगाव परिसरात वणव्याचे रौद्ररूप; शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू.. – आमदार रामदास मसराम शेतबांधावर..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव परिसराच्या शेतशिवारात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण करून परिसरातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.काहींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!