गडचिरोली :- जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान झालेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासन राजकीय आणि सेवा विभागाच्या १६ जानेवारी १९५८ च्या शासननिर्णयानुसार २०२३ वर्षाकरिता स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
सुट्यांमधे ९ ऑगस्ट २०२३ जागतिक आदिवासी दिन,१५ सप्टेंबर २०२३ पोळा,१३ नोव्हेंबर २०२३ दिवाळी या दिवसांकरिता गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सदर आदेश गडचिरोली जिल्हयातील दिवाणी फौजदारी न्यायालये,अधिकोष (बँक) यांना लागु होणार नाही.असे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी कळविले आहे.