Friday, October 16, 2026
Homeगडचिरोलीई पीक ॲपवर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार बोनस...- हेक्टरी १५ हजार रूपये...

ई पीक ॲपवर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार बोनस…- हेक्टरी १५ हजार रूपये बोनस बाबतचा निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- खरीप हंगामासाठी केंद्र शासनाने साधारण धानाला २०४० रुपये व ‘अ’ श्रेणी धानाला २०६० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला.परंतु, हमीभावापेक्षा धानाला उत्पादन खर्च अधिक येत असल्यामुळे तसेच यंदा झालेल्या अतिवृष्टी,नैसर्गिक आपत्ती व कोरोना महामारी प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अडचणीत सापडलेल्या राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यावे; अशी मागणी शेतकऱ्यांसह राजकीय पक्ष,विविध संघटनांनी शासनाकडे केली होती.या अनुषंगाने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी १५ हजार रूपये बोनस देण्याची घोषणा केली होती.२४ फेब्रुवारी रोजी शासनाच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने धान उत्पादक शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टर १५ हजार रूपये बोनस देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.त्यानुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी बोनस जाहीर केला आहे.मात्र यासाठी ई-पीक ॲपवर पिकांची नोंदणी असणे आवश्यक आहे.काही शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर नोंदणी करूनही नोंदणी न झालेल्या  शेतकऱ्यांना आता बोनसला मुकावे लागणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!