Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन कुटुंबाना शंभर टक्के अनुदानावर मिळणार जमीन... -...

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन कुटुंबाना शंभर टक्के अनुदानावर मिळणार जमीन… – जमिनीची विक्री करणाऱ्यांनी वीक्रीचे प्रस्ताव सादर करावे…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील दारीद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबाना शासनामार्फत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलिताखालील जमीन 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करुन द्यायची आहे. 

सदर जमीन शासनाने लाभार्थ्यांना खरेदी करुन द्यावयाची आहे.त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना जमीन विकावयाची आहे त्यांनी विकत असलेल्या जमीनीचा 7/12, जमिनीचा नकाशा,धारण करीत असलेल्या जमीनीचा तपशील (नमुना 8- अ),जमीन मोजणी “क” प्रत,गाव नकाशा, रु. 100 च्या स्टँम्पपेपरवर शपथपत्र इत्यादी माहितीसह जमीन विक्रीबाबतचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांचे कार्यालयास सादर करावा.शासन निर्णय दि.14 ऑगस्ट 2018 नूसार जमीन खरेदीबाबतची कार्यवाही करण्यात येईल.अधिकच्या माहितीसाठी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा असे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!