Tuesday, August 25, 2026
Homeवरोराचोरट्यांनी चक्क न्यायाधीशांच्या घरावरच मारला डल्ला…-घरातून सोने,चांदी व रोख रक्कम घेऊन झाले...

चोरट्यांनी चक्क न्यायाधीशांच्या घरावरच मारला डल्ला…-घरातून सोने,चांदी व रोख रक्कम घेऊन झाले पसार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

वरोरा(चंद्रपूर) :- एका वसाहतीमध्ये किरायाने राहणारे न्यायाधीश बाहेरगावी गेले असता घरात कुणी नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेत न्यायाधीशांचे घर फोडले.घरातून सोने,चांदी व रोख असा हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेला.ही घटना २४ मे रोजी उघडकीस आल्याने वरोरा शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

सीनियर डिव्हिजनचे दिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी डी.आर.पठाण हे देशपांडे पेट्रोल पंपाच्या मागील ओम शांती नगरातील चंद्रकांत पुसदकर यांच्या घरी मागील काही महिन्यापासून किरायाने राहत आहेत.काही दिवसांपूर्वीच ते बाहेरगावी गेले होते.२३ मे च्या रात्री चोरट्यांनी घरात कोणी नसल्याचे बघत घराच्या समोरील दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील १२ ग्रॅम सोन्याची चेन,दहा हजार रोख,सौदी अरेबियाचे पाचशे व दोनशे रुपयांचे डॉलर चोरून नेले; अशी माहिती वरोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली.२४ मे रोजी सकाळी घरमालक पहिल्या मजल्यावर गेले असता चोरी झाल्याचे दिसून आले. याबाबत वरोरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर वरोरा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.

ठसेतज्ज्ञ तसेच श्वान पथकास पाचारण केले.श्वान पथक चोरी झालेल्या ठिकाणाहून १०० ते १५० मीटरपर्यंत गेल्यानंतर परत आले.घटनास्थळावर जिल्हा गुन्हे शोध पथक दाखल झाले.घटनेचा तपास वरोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!