Thursday, July 16, 2026
Homeमुंबईमहाराष्ट्रातील हत्तीरोगाच्या एकूण प्रकरणांपैकी ७५ टक्के रुग्ण एकट्या नागपूर विभागात..

महाराष्ट्रातील हत्तीरोगाच्या एकूण प्रकरणांपैकी ७५ टक्के रुग्ण एकट्या नागपूर विभागात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग(लिम्फॅटिक फिलेरियासिस)निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए)अर्थात आयव्हरमेक्टिन,डीईसी (डायइथिलकार्बामाझीन)आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे.केंद्र शासनाने २०२७ पर्यंत भारतातून फिलेरियासिसचा पूर्णतः नायनाट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवारी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विशेषतः दुर्लक्षित असलेल्या फिलेरियासिससारख्या आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवात केली होती.देशात २०१७ मध्ये सर्व प्रथम महाराष्ट्रात विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांना या औषधोपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र शासनाकडे विनंती केली होती.यामुळे महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांचे दुःख मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे.तसेच,भारतातून फिलेरियासिस निर्मूलन करण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नपूर्तीतही मोठा वाटा उचलून या उपक्रमात महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य देत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील १२ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘मास ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एमडीए)मोहीम राबवली जात असून,त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.या मोहिमेत पात्र नागरिकांना दरवर्षी प्रतिबंधात्मक औषधे दिली जातात,ज्यामुळे रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते. राज्यामध्ये विशेष म्हणजे,काही निवडक जिल्ह्यांमध्ये पारंपरिक दोन औषधांऐवजी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए)वापरली जात आहे.ही उपचारपद्धती अधिक प्रभावी मानली जाते आणि कमी कालावधीत रोग नियंत्रणात आणण्यास मदत करते.
महाराष्ट्रातील विदर्भ विभागात हत्तीरोगाचा मोठा प्रादुर्भाव असून,गडचिरोली,भंडारा,चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहिमा राबवण्यात येत आहेत. राज्यात सुमारे ५५ लाख नागरिकांना या औषधोपचाराचा लाभ देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
तज्ज्ञांच्या मते, ‘आयडीए’ उपचारामुळे मायक्रोफिलेरिया(परजीवी)कमी करण्यास अधिक परिणामकारक मदत होते,त्यामुळे रोगाचा प्रसार लवकर थांबवता येतो.राज्य शासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ही औषधे घ्यावीत.समाजाच्या सक्रिय सहभागाशिवाय फिलेरियासिस निर्मूलन शक्य नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील या आजाराचा प्रादुर्भाव हा नागपूर, चंद्रपूर,भंडारा,वर्धा,गडचिरोली,अमरावती,अकोला, लातूर,धाराशिव,सोलापूर,जळगाव,सिंधुदुर्ग,नांदेड, ठाणे,पालघर,नंदुरबार,सोलापूर आणि यवतमाळ या १८ जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव आहे.फेब्रुवारी २०२६ च्या ताज्या अहवालानुसार,महाराष्ट्रातील हत्तीरोगाच्या एकूण प्रकरणांपैकी सुमारे ७५ टवके रुग्ण एकट्या नागपूर विभागात आहेत.
सर्वाधिक प्रभावित पाच जिल्हे: भंडारा,चंद्रपूर, नागपूर,गडचिरोली आणि गोंदिया.
ट्रीपल ड्रग पॉलिसी(आयडीए)यशाचा दर: नागपूर ग्रामीण भागात या मोहिमेमुळे सूक्ष्मजंतूंचा प्रसार दर( एमएफ रेट)२०१४ मधील ४.९१ टक्क्यावरून २०२४ पर्यंत एक टक्क्यापेक्षा कमी आणण्यात यश आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!