Sunday, August 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तप्रेरणादायी प्रवास..! एकेकाळी रेल्वे स्थानकावर चहा विकणारा आज 'शास्त्रज्ञ'..

प्रेरणादायी प्रवास..! एकेकाळी रेल्वे स्थानकावर चहा विकणारा आज ‘शास्त्रज्ञ’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- ‘जिथे इच्छाशक्ती असते,तिथे मार्ग मिळतोच; विद्यार्थ्यांनी कधीही हार मानू नये’, असा  मोलाचा संदेश देत मातीशी जुळलेली नाळ आजही त्यांच्या हृदयात वसलेली आहे.गोंदिया जिल्ह्याच्या  तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा या छोट्याशा गावातील रेल्वे स्थानकावर चहा विकणारा मुलगा आज अमेरिकेतील ‘सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क’ मध्ये वरिष्ठ वैज्ञानिक आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. डॉ.तारेंद्र लाखनकर यांचा हा प्रवास कठोर परिश्रम आणि दृढ इच्छाशक्तीचे जिवंत उदाहरण ठरला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंडीकोटा येथील जिल्हा परिषद शाळा आणि सुभाष विद्यालयात झाले.बालपणी रेल्वे स्थानकावर पालकांच्या चहाच्या टपरीवर मदत करणे आणि तुमसर येथे पिठाची गिरणी चालवत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. तुमसर येथील राष्ट्रीय विद्यालय आणि एस.एन.मोर महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर,त्यांनी नागपूर(व्हीएनआयटी),नांदेड आणि मुंबई येथून उच्च शिक्षण पूर्ण करून थेट अमेरिकेतील संशोधनाचे क्षेत्र गाठले. संशोधन क्षेत्रात त्यांनी विशेषतः हवामान बदल, अंतरिक्ष विज्ञान,हिमालयीन पर्वतरांगा आणि ‘नासा’च्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर मोलाचे कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अमेरिकेत ‘प्रेसिडेंट अवॉर्ड’ ने गौरविण्यात आले.जगातील ४० हून अधिक देशांमध्ये विज्ञानाचा प्रसार करणाऱ्या या शास्त्रज्ञाच्या जीवनावर आधारित ‘एका ताऱ्याची झेप’ हे पुस्तक आज जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहे.महत्वाचे म्हणजे,डॉ.तारेंद्र लाखनकर हे आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून  दरवर्षी आपल्या मूळ गावी मुंडीकोटा येथे येतात. नुकत्याच झालेल्या भेटीत त्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान केला आणि शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘जिथे इच्छाशक्ती असते,तिथे मार्ग मिळतोचः विद्यार्थ्यांनी कधीही हार मानू नये’, असा मोलाचा संदेश त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना दिला. मुंडीकोटा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंचा प्रतिमा जैतवार आणि उपसरपंच देवेंद्र मंडपे यांनी त्यांचा गौरव केला.याप्रसंगी आयोजित सोहळ्यात एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य प्रल्हाद हरडे आणि ग्रीन हेरिटेज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मो.सईद शेख यांनी त्यांच्या संघर्षावर प्रकाश टाकला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाचखोर विभागीय वन अधिकाऱ्यास चार दिवसांची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ३१ जुलै रोजी जशी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली,तशीच...

आज २५० युवक-युवतींनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ; गडचिरोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत(MY Bharat)यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'व्यसनमुक्त युवा- विकसित भारत संकल्प अभियान' अंतर्गत आज...

आता राज्यात अंमलात येणार धर्मांतर-विरोधी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा-२०२६’.. -कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास सात वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात अनेक नागरिकांनी स्वतःचा धर्म बदलून दुसऱ्या धर्माचे स्वीकार केल्याचे,तसेच धर्म बदलल्यानंतरही मूळ धर्मातील लाभ घेण्याचा सपाटा चालवल्याचे...

अखेर ‘त्या’ आत्महत्येचे कारण आले समोर.. – दोन सख्ख्या भावांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील माळेगाव  टाऊन परिसरात गुरुवार ३० जुलै २०२६ रोजी दोन सख्ख्या भावांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!