Saturday, September 26, 2026
Homeठाणे१९ वर्षीय तरुण प्रेमात पडला ; अन दुचाकी चोऱ्यांचा सपाटाच लावला....- प्रेयसीवर...

१९ वर्षीय तरुण प्रेमात पडला ; अन दुचाकी चोऱ्यांचा सपाटाच लावला….- प्रेयसीवर पैसे उधळण्यासाठी तब्बल १३ टुव्हीलर चोरल्या….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

ठाणे :- दुचाकी चोरटा सुरुवातीला छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा; गेली तीन वर्षे रस्ताच्या कडेला असलेल्या,इमारतींच्या पार्किंग केलेल्या आवारातील दुचाकी चोरण्यात पटाईत झाला.चोऱ्या करता करता एका तरुणीच्या प्रेमात पडला.प्रेमात पडताच प्रेयसीवर पैसे उधळण्यासाठी त्याने दमदार चोऱ्यांचा सपाटा लावला.चोरलेल्या दुचाकी मिळेल त्या किंमतीत विकून आलेला पैसा प्रेयसीवर उधळू लागला.मात्र क्राईम ब्रँचचे कॉन्स्टेबल गुरूनाथ जरग यांची तीक्ष्ण नजर या चोरट्यावर पडली आणि चोऱ्या करून अय्याशी जीवन जगणाऱ्या या चोरट्याला आता पोलीस कोठडीनंतर जेलची हवा खावी लागणार आहे.आरोपीचे नाव शुभम पवार असून तो फक्त १९ वर्षाचा आहे.

कल्याण डोंबिवली शहरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने होत आहेत.त्या अनुषंगाने दाखल झालेल्या तक्रारीवरून कल्याण गुन्हे शाखा घटक ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या पथकाने सदर ठिकाणा वरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीचा शोध सुरू केला.
यातील आरोपी डोंबिवली मधील कोळेगाव मानपाडा याठिकाणी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिस अंमलदार गुरुनाथ जरग, पोलीस हवालदार अनुप कामत, विनोद चन्ने यांनी सदर ठिकाणी सापळा रचत शुभम पवार या १९ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मागील दोन वर्षात १३ दुचाकी चोरल्या असल्याचे कबूल केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!