- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोच्या तांत्रिक समितीचा सदस्य केदार उर्फ मन्या किंजो नैताम वय ४२ वर्षे याने आज,शुक्रवारी ३० ऑगस्टला पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.शासनाने त्याच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
केदार नैताम हा धानोरा तालुक्यातील कोसमी क्रमांक- १ येथील रहिवासी आहे.२००२ मध्ये तो टिपागड दलममध्ये भरती झाला.२००७ पासून तो उत्तर गडचिरोली विभागाच्या तांत्रिक समितीचा सदस्य झाला.२०१२ पासून २०२० पर्यंत तो प्लाटून क्रमांक- १५ मध्ये कार्यरत राहिला.त्यानंतर त्याची एरिया कमिटी सदस्य म्हणून बढती झाली.सध्या तो पश्चिम सबझोनल ब्युरोच्या तांत्रिक समितीचा सदस्य म्हणून काम पाहत होता.
त्याच्यावर चकमकीचे १८,जाळपोळीचे ३,खुनाचे ८ आणि अन्य ६ अशा एकूण ३४ गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने त्याच्यावर ६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.२०२२ पासून आतापर्यंत २५,तर आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून ६७३ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे.नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे; असे आवाहन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले आहे.
- Advertisement -

