Saturday, September 12, 2026
Homeगोंदिया१६ सरपंचांनी खासगी वाहन केले; जाण्यास निघाले, अन् फोन येता अर्ध्याच रस्त्यातून...

१६ सरपंचांनी खासगी वाहन केले; जाण्यास निघाले, अन् फोन येता अर्ध्याच रस्त्यातून परतले 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गोंदिया :- राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान २०२२-२३ अंतर्गत सरपंचांचे चार दिवसीय पायाभूत प्रशिक्षण चंद्रपूर येथे ९ ते १२ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले.पंचायत समितीने त्यासंदर्भात देवरी तालुक्यातील १६ सरपंचांना निमंत्रण दिले.१५ महिला आणि एक पुरूष सरपंच जाण्याकरिता निघाले.मात्र अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर आयोजकांनी प्रशिक्षक आले नसल्याने प्रशिक्षण रद्द करण्यात आल्याचे कळविले.त्यामुळे त्या सरपंचांना अर्ध्याच रस्त्यातून परत यावे लागले.यामुळे शासकीय कार्यक्रमांच्या नियोजनाचे पितळ उघडे पडले आहे. 

चंद्रपूर येथील वन प्रबोधिनी येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान २०२२-२३ अंतर्गत सरपंचांकरिता ४ दिवसांचे निवासी क्षमता बांधणी उजळणी,पायाभूत प्रशिक्षण ९ ते १२ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.प्रशिक्षणात सरपंच पदाची कार्ये, जबाबदारी,गावाचा सर्वागिण विकास आदी बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार होते.त्याकरिता जिल्हा परिषदेने दिलेल्या सूचनेनुसार पंचायत समितीने देवरी तालुक्यातील १४ सरपंचांची निवड केली.त्यात मुरपार,चिचेवाडा,फुक्कीमेटा,ढिवरीनटोला,ओवारा, भागी,पुराडा,डोंगरगाव,पिपरखारी,चिचगड,पळसगाव, शेडेपार जेठभावडा,मुल्ला,पलानगाव आणि वांढरा या १६ सरपंचांना आमंत्रित करण्यात आले होते.यात एका पुरुषाचा देखील समावेश होता.आपल्याला उपयुक्त माहिती मिळणार असल्याने सरपंच देखील जाण्यास तयार झाले.सर्व सरपंच खासगी वाहनाने चंद्रपूरला जाण्याकरिता निघाले.परंतु,अर्ध्या रस्त्यात त्यांना प्रशिक्षण रद्द करण्यात आल्याची सूचना देण्यात आली.त्यामुळे सर्व सरपंच माघारी परतले.उल्लेखनीय म्हणजे नियोजन करतांना आयोजकांनी काळजी का घेतली नाही.सरपंचांना नाहक त्रास देण्याचे कारण काय? असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!