- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-ऐन भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह सुरू असतांनाच गडचिरोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता व परीचर(शिपाई)लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे.कार्यकारी अभियंत्याने देयक मंजूर करून देण्यासाठी दोन टक्क्यांप्रमाणे १२ हजाराची लाच मागणी करून ती परीचराच्या माध्यमातून जिल्हा परिषद कार्यालयात स्विकारतांना ॲन्टी करप्शन ब्युरो गडचिरोलीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.नितीन तानाजी बारहाते,वय ५६ वर्षे,पद-कार्यकारी अभियंता,जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली रा.प्लाट नं.२ फ्लैट नं.६०१,वेदांत पेरिदोट,सेंट्रल बाजार रोड बजाज नगर शंकर नगर नागपूर हल्ली मुक्काम पुल्लरवार यांचे घरी किरायाने शिवानी पेट्रोल पंम्प समोर आरमोरी रोड गडचिरोली.तसेच ईश्वर गोपाळजी निसार वय ५७ वर्षे,पद-परिचर जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली,हल्ली मुक्काम सोनापूर कॉम्प्लेक्स वार्ड क्र.१४ जि. गडचिरोली अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,तक्रारदार यांना सन २०२४-२०२५ या वित्तीय वर्षातील एकात्मीक बालविकास सेवा योजना अंतर्गत मौजा-जांभगांव येथील ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्याचे १३ लाख ७८ हजार रुपयांचे कंत्राट मिळाले होते.सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना बिलाची काही रक्कम मिळाली असून,उर्वरीत ६ लाख १५ हजार रुपयांचे बिल बाकी असल्याने तक्रारदार हे २२ ऑक्टोंबर २०२६ रोजी नितीन बारहाते कार्यकारी अभियंता,बांधकाम विभाग,जिल्हा परीषद गडचिरोली यांना जावून भेटले असता,त्यांनी तक्रारदार यांना उर्वरीत बिल काढण्याकरीता उर्वरीत बिलाचे २ टक्के रक्कम द्यावी लागेल,असे सांगुन पुढील बोलणे चपराशी यांचेसोबत करा,असे सांगीतले.पंरतु त्या दिवशी तक्रारदार यांचे नातेवाईक मरण पावल्याने ते त्या दिवशी चपराशी यांना न भेटता त्यांनी काल,बुधवार २८ ऑक्टोंबर २०२६ रोजी पैसे मागणाऱ्यांच्या कार्यालयात जाणार असून तेथे त्यांना लाचेची मागणी होण्याबाबत खात्री असल्याची तक्रार गडचिरोली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.म्हणजेच तक्रारदार हे सर्वप्रथम एसीबी कार्यालयात पोहचले व तेथे तक्रार नोंदवली.त्यानुसार,एसीबीचे पथक व तक्रारदार शासकिय पंचासह ईश्वर निसार यांना जावून भेटले असता,त्यांनी नितीन बारहाते यांच्या म्हणण्यानुसार उर्वरीत बिलावर २ टक्के रक्मेप्रमाणे १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.परत तक्रारदार हे कार्यकारी अभियंता नितीन बारहाते यांचेकडे मागणीचे पडताळणीकरीता गेले असता,त्यांनी परिचर ईश्वर निसार यांचेसोबत बोलुन घ्या व पैसे आणुन देण्यास सांगीतले. त्यानुसार,१२ हजाराची रक्कम घेताच पथकाने दोघांच्याही मुसक्या आवळल्या.या प्रकरणी आज गुरुवारी कार्यकारी अभियंता व परिचर यांचे विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८(सुधारणा २०१८) चे कलम कलम-७,१२ प्रमाणे गडचिरोली पोलिस ठाण्यात अप.क्र.१६४४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई दिगंबर प्रधान,पोलीस अधिक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो,नागपुर परीक्षेत्र,माधुरी बाविस्कर, अप्पर पोलीस अधिक्षक,ला.प्र.वि.नागपुर,विजय माहुलकर, अप्पर पोलीस अधिक्षक,ला.प्र.वि.नागपुर यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधिक्षक विक्रांत सगणे, ला.प्र.वि.गडचिरोली,सापळा पथक पोहवा/किशोर जौजारकर,पोहवा/राजेश पदमगिरीवार,
पो.अ./संदिप घोरमोडे,पो.अ./प्रविण जुमनाके, पो.अ./संदिप उडाण यांचेसह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली आदींनी पार पाडली.
- नागरिकांना आवाहन👇
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरीक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ ॲन्टी करप्शन ब्युरो,गडचिरोली यांचेशी संपर्क साधावे,असे आवाहन पोलीस उपअधिक्षक विकांत सगणे यांनी केले आहे.
पोलीस उपअधिक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरो कार्यालय गडचिरोली
मोबाईल / व्हॉटसॲप कमांक- ७५८८०४१०६४
दुरध्वनी कमांक ०७१३२-२९५०२०
टोल फ्री कमांक-१०६४
- Advertisement -

