- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सोशल मीडियाचा ट्रेण्ड(कल) वाढल्याने नातेसंबंधांवर खूप विपरीत परिणाम होतांना दिसून येत आहे.गेल्या तीन वर्षांमध्ये पती-पत्नीमध्ये घटस्फोट होण्याच्या घटना तीन पटींनी वाढल्याचे चिंताजनक वास्तव एका सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.महत्त्वाचे म्हणजे,घटस्फोट घेणाऱ्यांचे देशात सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात असल्याचे धक्कादायक वास्तवदेखील या अहवालातून पुढे आले आहे. ‘एडजुआ लीगल्स गुगल ॲनालिटिक २०२५’ च्या अहवालानुसार दिल्ली,मुंबई, बंगळुरू,कोलकाता, लखनौ,हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अलीकडील वर्षांत घटस्फोटाच्या अर्जाची संख्या तीन पटीने वाढली आहे. ‘कम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेवियर’ मध्ये प्रकाशित संशोधनातून हे वास्तव समोर आले आहे.अहवालात घटस्फोटांच्या प्रमाणाची तुलना प्रत्येक व्यक्तीच्या फेसबुक अकाउंटसोबत करण्यात आली.सोशल मीडियाच्या उपयोगामुळे वैवाहिक संबंध संशयाच्या भोवऱ्यात सापडत असल्याचे या अहवालातून ठळकपणे पुढे आले आहे.
नात्यांमध्ये ओलावा👇
दगदगीचे जीवन आणि वेगवान जीवनशैलीमुळे लोकांच्या आयुष्यात विविध प्रकारचे तणाव निर्माण होत आहेत.नोकरदार पती किंवा पत्नीला वेळ कमी मिळत असल्याने नात्यांना वेळ देणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.कामाचे लांबलचक तास, कामावर जाण्यासाठी खर्च होणारा वेळ,नोकरीतील तणाव आणि दबाव,वाढती महागाई,आर्थिक जुळवाजुळवीची कसरत आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे यामुळे नात्यांमध्ये ओलावा नसल्याचे दिसून येते.
वयोगट घटस्फोट टक्केवारी
१८-२४ – २७.६%
२५-३४ – ३५.१%
३५-४४ – १६.२%
४५-५४ – १०.०%
५५-६४ – ०७.०%
६५+ – ०.५%
- Advertisement -