Thursday, January 22, 2026
Homeनागपूरसाहित्याशी सुतराम संबंध नसलेल्या जेसीबी साहित्य पुरस्कारास विरोध... - 'जेसीबी' ही अनधिकृत...

साहित्याशी सुतराम संबंध नसलेल्या जेसीबी साहित्य पुरस्कारास विरोध… – ‘जेसीबी’ ही अनधिकृत पाडापाड,हिंसेसाठी वापरण्यात येणारे कंपनीचे उपकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘जेसीबी साहित्य पुरस्कार’ या विशिष्ट कंपनीच्या पुरस्कारावरून सध्या देशभरातील साहित्य क्षेत्रात वादळ उठले आहे.साहित्याशी सुतराम संबंध नसलेल्या या कंपनीच्या नावे सर्वोच्च रकमेचा पुरस्कार देण्यात येत आहे.अनधिकृत पाडापाड, हिंसेसाठी वापरण्यात येणारे या कंपनीचे उपकरण म्हणजे ‘बुलडोझर राजकारणा’चे प्रतीक असल्याची टीका करीत या पुरस्काराविरोधात देशभरातील परिवर्तनवादी साहित्यिक,संपादक, प्रकाशकांनी निषेधपत्र लिहिले आहे.विदेशी लेखकांचाही यात समावेश आहे.

जेसीबी साहित्य पुरस्कार २०१८ पासून भारतात सुरू झाला.या पुरस्काराची राशी लेखक व अनुवादक मिळून ३६ लाख रुपये असून,ती भारतातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कारापेक्षा दुप्पट आहे.विशेष म्हणजे ‘माझ्यातील लेखकाचा मृत्यू झाला’, असे म्हणणारे प्रसिद्ध तमिळ लेखक पेरूमल मुरुगन यांनाही जेसीबी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून,यंदाच्या पुरस्कार यादीत महाराष्ट्रातील दलित लेखक शरणकुमार लिंबाळे यांचे नाव चर्चेत आहे.
गेल्या काही दिवसांत भारतात या पुरस्काराला विरोध सुरू झाला आहे.विशेषतः सर्वोच्च न्यायालयाने ‘बुलडोझर न्याय’ चर्चेत असलेल्या प्रशासनिक कारवाईसंबंधी याचिकेवर सुनावणी करतांना केलेल्या टिप्पणीवरून हा विरोध आणखी व्यापक झाला आहे. निषेधपत्रानुसार उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,गुजरात, आसाम,दिल्ली या राज्यांमध्ये प्रशासनिक अधिकाऱ्यांनी सांप्रदायिक हिंसा किंवा प्रशासनाद्वारे होणाऱ्या भेदभावाविरोधात प्रदर्शन करणाऱ्यांना शिक्षा म्हणून ‘बुलडोझर’द्वारे त्यांची घरे व प्रतिष्ठाने पाडली,उद्ध्वस्त केली.यामध्ये विशिष्ट समुदायालाच लक्ष्य करण्यात आल्याचे या पत्रात नमूद केले आहे. या कारवाईत वारंवार जेसीबीच्या उपकरणांचा उपयोग करण्यात आला व माध्यमांनी ‘बुलडोझर न्याय’ याच नावाने ते प्रचारीत केले.विशेष म्हणजे, इजराइलने सुद्धा पॅलेस्टाइन लोकांविरोधात कारवाई करतांना याच उपकरणांचा उपयोग केला.
जेसीबी ही ब्रिटनमधील बांधकाम साहित्य तयार करणारी कंपनी असून,तेथील कन्झव्हेंटिव्ह पक्षाच्या राजकारणासाठी अर्थ पुरवठा करणारी प्रमुख कंपनी आहे.भारतात व इतर देशातही अशाप्रकारे बहुसंख्याकवादी व हिंसक प्रवृत्तीच्या राजकीय शक्तींना मदत करून नफा कमाविण्याचे काम कंपनीद्वारे होत असल्याचा आरोप या लेखकांनी केला आहे.अशा गरीब,शोषित लोकांची आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या नावे लेखकांनी पुरस्कार घेऊ नये,असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.विरोध करणाऱ्यांमध्ये भारतीय लेखक,संपादकांसह अमेरिका,ब्रिटेन,पॅलेस्टाइन,फ्रान्स,युरोपीय साहित्यिकांचाही समावेश आहे.
प्रकाश चंद्रायन,ज्येष्ठ पत्रकार,लेखक👇
आज बुलडोझर म्हणजे कुणालाही उद्ध्वस्त करण्याचा राजकीय अहंकाराचे प्रतीक होय. अशा हिंसक प्रवृत्तीला अधिकृत-अनधिकृत मदत करणाऱ्या कंपनीचा हा प्रचारकी पुरस्कार होय.रचनाकार हा सृजन करतो,विध्वंश नाही.त्यामुळे भारतीय लेखकांनी चेतना नष्ट करणारा हा पुरस्कार स्वीकारू नये.
श्रीपाद भालचंद्र जोशी,ज्येष्ठ साहित्यिक👇
कोणत्याही कॉर्पोरेट कंपन्यांनी लाखो रुपये किंमतीचे पुरस्कार देऊच नये व लेखकांनी ते सरसकट स्वीकारूच नये,असे कोणीही म्हणत नाही.मात्र, पुरस्कारामागे विशिष्टच हेतूंच्याच राजकारणाला व पक्षांना या कंपन्या सत्ताप्राप्तीसाठी,सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक सहकार्य कां करतात,त्याची इष्टानिष्टता तपासण्याचा व त्यामागील अनिष्ट राजकारण उघडपणे मांडण्याचाही लोकशाहीत अधिकार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत.. – आरोपीस सात दिवसाची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगल परिसरात सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील...

अधिकचे आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिकचे ओबीसी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा झाल्याचे...

थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन वनरक्षकाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन एका ३० वर्षीय वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार २१ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मुरमाडी गावातील...

पिकअप वाहनाचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर १३ जखमी.. – आज सकाळच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील नांदगाव येथे आज,बुधवार २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडून अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला,तर १२ जणांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!