- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्य सरकारच्या पणन विभागाने किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आता १५ जानेवारी २०२५ पर्यंत नोंदणी करता येणार असून, किमान आधारभूत दराने धानाची विक्री करता येणार आहे.
गडचिरोली,भंडारा,गोंदिया,नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी राज्य सरकारच्या वतीने एमएसपी(किमान आधारभूत किंमत)दरात धानाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.सन २०२४-२५ च्या विपणन हंगामासाठी सुरुवातीला १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याची मुदत दिली होती.या काळात कमी नोंदणी झाल्याने तसेच काही ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब झाल्याने नोंदणीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.शासकीय धान खरेदीने अजूनही पाहिजे तसा वेग न घेतल्याने या नोंदणीला दुसऱ्यांना मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आता १५ जानेवारीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करून किमान आधारभूत दराने सरकारला धानाची विक्री करता येणार आहे.
- Advertisement -

