- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथील धारीवाल पॉवर स्टेशनच्या पाणी पाइपलाइनमुळे दरवर्षी लाखो रुपयांच्या शेतपिकांचे नुकसान होत आहे.हा अतिशय गंभीर विषय असतांनाही चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी यावर गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये उत्तर सादर केले नाही.त्यामुळे न्यायालयाने काल बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना फटकारून उद्या,शुक्रवारी ६ डिसेंबरला उत्तरासह हजर होण्याचा आदेश दिला आहे.
यासंदर्भात अंतुर्ला येथील अशोक कौरासे व इतर चार पीडित शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.जल संसाधन विभागाने ६०० मेगावॅट क्षमतेच्या धारीवाल पॉवर स्टेशनला दरवर्षी वर्धा नदीमधील १९.२६ क्युबिक लिटर पाणी वापरण्यास,तर जिल्हाधिकाऱ्यांनी पॉवर स्टेशनपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी पाइपलाइन टाकण्यास परवानगी दिली आहे.त्यानुसार,धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने धानोरा,वढा,पांढरकवडा,महाकुर्ला,अंतुर्ला,शेणगाव, सोनेगाव,येरूर व गवराळा या गावांमधील शेतातील शिवधुऱ्यावरून सुमारे २० किलोमीटर लांब पाइपलाइन टाकली आहे.ही पाइपलाइन अनेकदा फुटते.त्यामुळे शेतात पाणी शिरून पिकांचे नुकसान होते.यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रारी केल्या, पण त्यांनी दखल घेतली नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
याचिकाकर्त्यांच्या वकील ॲड.शिल्पा गिरटकर यांनी धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी जबाबदारीने वागत नाही; असा आरोपही केला.पाइपलाइनची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंपनीची आहे.परंतु,ही कंपनी याकडे नियमित लक्ष देत नाही.वर्षातून केवळ एकदाच देखभाल व दुरुस्तीचे काम केले जाते,याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
- Advertisement -