- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिना तत्पूर्वी शिव जन्मोत्सव समिती कोंढाळा तर्फे दरवर्षी विविध स्पर्धा तसेच इतर समाजोपयोगी कार्यक्रम गावामध्ये आयोजित करण्यात येतात.अश्याच प्रकारे शिव जन्मोत्सव समिती कोंढाळा,संयुक्त वन व्यवस्थापन समिती,पी एम श्री शाळा,विद्या निकेतन शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने कोंढाळा येथे २२३ विद्यार्थ्यांनी सामान्य ज्ञान स्पर्धा,निबंध स्पर्धा,चित्रकला,वकृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवून विविध स्पर्धा पार पडल्या.
गेल्या ८ वर्षांपासून दरवर्षी शिव जन्मोत्सव समितीकडून परीक्षा घेतल्या जायच्या.अशातच आता यावर्षीपासून गावातील शाळा व विविध समित्यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार काल रविवार २ फेब्रुवारीला संत तुकाराम महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून चार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेला सुरवात करण्यापूर्वी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारताचे शिल्पकार डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मल्यार्पण करून स्पर्धेला सुरवात करण्यात आली.स्पर्धे निमीत्त ग्रामसेवक पांडुरंग बुराडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा झपाट्याने वाढत आहे.आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे.या स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थी फार मागे असलेला पहायला मिळतो.हा ग्रामीण विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेत मागे राहू नये.त्यांची शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी व्हावी, यासाठी शिव जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून स्पर्धा घेण्यात येत आहे.मंडळातर्फे ८ वर्षापासून दरवर्षी नि:शुल्क विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धा,निबंध स्पर्धा परीक्षा घेतली जात असल्याने हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन बुराडे यांनी केले.
या स्पर्धेला व मार्गदर्शन सोहळ्यास ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत,देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष
सुनील पारधी,गजानन सेलोटे उपसरपंच,किरण कुंभलवार पोलीस पाटील,निखिल गोरे फेलो मंत्रालय पंचायत राज,प्राध्यापक पंकज धोटे,अरुण कुंभलवार सामाजिक कार्यकर्ता,ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप तूपट उपस्थीत होते.मार्गदर्शन सोहळ्याचे प्रस्ताविक प्रदीप तुपट यांनी केले तर आभार मदन पचारे यांनी केले.स्पर्धेस नितेश पाटील,रोशन ठाकरे,आशिष दोनाडकर,जयंत दुपारे,अजय चंद्रवंशी,नंदू बेहरे , अंकित शेंडे,दिनेश मैंद,मदन पचारे,अजय भर्रे,सोमेश्वर आडकिने,अतुल वनस्कार,आशिष खोब्रागडे,सूरज झिलपे,विकास मोहूर्ले,आकाश पेटकुले यांचे सहकार्य लाभले.छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिव जन्मोत्सव समिती कोंढाळा तर्फे दरवर्षी पंधरवडा साजरा करण्यात येत असून याही वर्षी येत्या १६ फेब्रुवारीला दौड स्पर्धा,१८ फेब्रुवारीला नृत्य स्पर्धा,महिलांकरिता वेशभूषा स्पर्धचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा; असे आवाहन समिती तर्फे करण्यात आले आहे.
- Advertisement -