- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा-शिवजन्मोत्सव समिती तर्फे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम,स्पर्धा तसेच सामाजिक,शैक्षणिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचा पंधरवडा राबवून आज,बुधवार १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आज बुधवारची सायंकाळ “जय शिवाजी,जय भवानी” च्या घोषणांनी दुमदुमली तर शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवाजी महाराज यांची साकारण्यात आलेली वेशभूषा व अश्र्वावर स्वार झालेले शिवराय यांच्या मिरवणुकीने सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडले होते.अशातच झांकी,आखाडा व जय घोषणांनी गावात ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मिरवणूक काढून गावातील मुख्य चौका-चौकात झांकीच्या सादरीकरणाने एक अनोखी व उत्साहित शिवजयंती यावेळी पहावयास मिळाली.गावातील आबालवृद्ध,तरुण मंडळी,महिला मंडळी,प्रतिष्ठित नागरिक,पदाधिकारी यांचेसह सर्वधर्म समभाव समतेचा संदेश देत शिवजन्मोत्सव समिती कोंढाळा तथा सर्वांच्या सहकार्याने यंदाची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
झांकी चे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇
- Advertisement -