उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा:- युवकांचा ध्यास ग्राम,शहर विकास कार्यक्रमा अंतर्गत शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज राष्ट्रीय सेवा योजना निवासी श्रमसंस्कार विशेष शिबिरातून विद्यार्थ्यांना विविध विषय मार्गदर्शनपर ‘विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेऊन कार्य करावे’ असे देसाईगंज पोलीस ठाण्याचे उपनरीक्षक सुजाता भोपळे यांनी म्हटले आहे.
सदर कार्यक्रमाकरिता वक्ते म्हणून सुजाता भोपळे पोलीस उपनिरीक्षक देसाईगंज यांनी “महिलांसाठी रोजगाराच्या संधी व महिला सबलिकरण” या विषयावर मार्गदर्शन केले.डी.वि.सूर गटनिर्देशक औद्योगीक प्रशिक्षण संस्था देसाईगंज यांनी”व्यवसाय शिक्षणाचे महत्व,सर्पविज्ञान व संत परंपरा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर प्रात्यक्षिक करून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन आपल्या ज्ञानेंद्रियांवर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील खऱ्या संतांची संतवाणी, परंपरा जोपासावी असे आव्हान केले.तसेच ग्रामीण भागातील सापांविषयी जागरूकता संवाद व प्रश्न-उत्तराच्या माध्यमातून माहिती दिली.
कार्यक्रमाला लाभलेले राजीव सिंग संस्थापक सिंग कोचिंग क्लासेस यांनी स्पर्धापरीक्षा तयारी व त्यांचे अभ्यासक्रमाबद्धल मार्गदर्शन करून स्वतःचे भविष्य उज्वल करा आणि प्रशासनास सहभागी व्हा असे सांगितले.
सुजाता भोपळे पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन देसाईगंज यांनी विध्यार्थ्यानी उच्च ध्येय ठेऊन कार्य करावे असे सांगितले.मोबाईलचे दुष्परिणाम,होणारी फसवणूक आणि निर्माण होणारे सायबर क्राइम या विषयावर ग्रामवासीयांना जागृत केले.
त्यानंतर अपर्णाताई राऊत सरपंचा ग्रा.पं.कोंढाळा यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रातच कार्य करावी असे सांगितले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. वि.सूर गट निर्देशक औ.प्र.संस्था देसाईगंज,मंचावर किरणताई कुंभलवार,सूरज चौधरी रासेयो समन्वयक, सी.एम.गरमळे,सह-समन्वयक,वि.व्हाय.नागमोती, जाधव आदि उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी ए.व्ही.भोले,सी.डी.समर्थ सर, आर.के.लोही,एस.एस.प्रधान,सतीश मेश्राम,हेमंत मरसर्कोल्हे, लता लाडे,कर्मचारी औ.प्र.संस्थेचे कर्मचारी व उच्च प्राथमिक शाळेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक प्रणय राऊत व आभार प्रदर्शन कु.प्रचिती नाकाडे यांनी केले.