- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समन्स बजावला असून येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी त्यांना याबाबत न्यायालयात उत्तर सादर करा,असे म्हटले आहे.
वडेट्टीवार यांचा नामनिर्देशन अर्ज व प्रतिज्ञापत्र आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने स्टॅम्प पेपर वापरणे यासंदर्भात बेकायदेशीर काम करण्यात आल्याचा दावा करीत न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली.ब्रम्हपुरी येथील परिवर्तन महाशक्ती संयुक्त आघाडी,स्वाभिमानी पक्ष,स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार ॲड.नारायण जांभुळे यांनी ही याचिका दाखल केली.या प्रकरणावर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्यासमक्ष सुनावणी झाली.याचिकेनुसार,ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले.वडेट्टीवार यांनी दाखल केलेल्या या प्रतिज्ञापत्रात वापरलेला स्टॅम्प पेपर त्यांच्या नावाचा नसून,त्यांच्या पत्नीच्या नावे आहे.वडेट्टीवार यांच्या पत्नीने हा स्टॅम्प पेपर ‘करारनामा’ साठी घेतला होता.मात्र,स्टॅम्प पेपरचा वापर नव्या अक्षरात ‘प्रॉमिसरी नोट’ लिहून विधानसभा निवडणुकीत विजय वडेट्टीवार यांनी स्वतःच्या उमेदवारीसाठी करण्यात आला.ही घटनात्मक फसवणूक असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला.एका व्यक्तीच्या नावाने खरेदी केलेला स्टॅम्प पेपर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर वापरता येत नाही.त्यामुळे वडेट्टीवार यांचे प्रतिज्ञापत्र अवैध ठरवण्यात यावे व त्यांची नामनिर्देशन याचिका रद्द करावी,अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.वडेट्टीवार यांना न्यायालयात २५ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करायचे आहे.त्यामुळे उत्तर समाधानकारक असणार की नाही,वडेट्टीवार यांची आमदारकी शाबूत राहणार की नाही,अश्या चर्चांना उधाण आले असून,पुढील येत्या काळात कळणार आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड.जांभुळे यांनी स्वतः बाजू मांडली.
- Advertisement -