- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-अलीकडच्या काळात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे.त्यातच मानवाची किंमत ही पैश्यात मोजली जात आहे.वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानवाचा मृत्यू झाल्यास वारसदाराला वीस लाख,अपंगत्व आल्यास पाच लाखांची तर गंभीर जखमी झाल्यास केवळ एक लाख पंचवीस हजारांची मदत दिली जात होती.मात्र,मागील वर्षी त्यात वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पंचवीस लाख, जायबंदी झाल्यास साडेसात लाख तर गंभीर जखमी झाल्यास पाच लाखांची मदत दिली जाणार आहे.मात्र मनुष्यहानी किंवा पशुहानी झाल्यास त्याची माहिती ४८ तासात वन विभागाला किंवा पोलिसांना कळवणे बंधनकारक आहे.
शहरी भागातील लोकवस्तीपासून ते ग्रामीण भागातील वाड्या,वस्तीपर्यंत बिबट्याचा वावर आहे.अनेक ठिकाणी नागरिकांच्या तक्रारीनंतर वन विभागाकडून पिंजरे लावून बिबटे जेरबंद केले जातात.दिवसेंदिवस बिबट्यांच्या संख्येत वाढ होत आहे.अनेकदा बिबटे अन्न पाण्याच्या शोधत मानवी वस्तीकडे येतात. अनेकदा बिबट्या आणि मानवाचा संघर्ष बघायला मिळतो.यावर उपाययोजना करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानवाचा मृत्यू झाल्यास वारसदाराला पूर्वी वीस लाख मिळत होते.आता २५ लाख रुपये मिळत आहेत.हल्ला झाल्यानंतर त्याबाबतची माहिती घटनेच्या ४८ तासांच्या आत संबंधित वनविभागाला कळविणे किंवा १९२६ यावर माहिती देणे गरजेचे असते. याच्यापेक्षा उशीर झाल्यास मदतीसाठ अडचणी येतात.घटना झाल्यास तत्काळ १५ लाख त्यानंतर दहा लाख पाच वर्षे तर पाच लाख दहा वर्षाकरिता एफडी केली जाते.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाल्यास औषध उपचारासाठी येणारा खर्च दिला जातो.मात्र, खासगी रुग्णालयात औषध उपचार करणे आवश्यक असल्यास त्याची मर्यादा ५० हजारपर्यंत प्रतिव्यक्त्ती असल्याचे शासन आदेशात म्हटले आहे.
बिबट,वाघ,अस्वल,लांडगा,तरस,कोल्हा,रानडुक्कर, माकड,नीलगाय,खोकड,रानगवा या प्राण्यांकडून मानवावर वा पशुंवर हल्ला झाल्यास शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.
- Advertisement -