Wednesday, November 18, 2026
Homeगडचिरोलीराज्याचे मुख्य सचिव सिरोंचा तालुक्यात; शैक्षणिक संस्था व पायाभूत सुविधांची पाहणी..

राज्याचे मुख्य सचिव सिरोंचा तालुक्यात; शैक्षणिक संस्था व पायाभूत सुविधांची पाहणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-वडदम येथील जीवाश्म उद्यानाचा भूवैज्ञानिक वारसा जतन करून पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध विकासकामे,शैक्षणिक संस्था आणि पायाभूत सुविधांची पाहणी केली.यावेळी नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक योगेश कुमार गुप्ता,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिवांनी वडदम येथील जीवाश्म उद्यानाला (फॉसिल पार्क)भेट देऊन परिसराची पाहणी केली. उद्यानातील जीवाश्मांचे संवर्धन आणि पर्यटनविकासाबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक निर्देश दिले.यावेळी कोलकाता येथील संग्रहालयात ठेवण्यात आलेले डायनासोरचे जीवाश्म मूळ ठिकाणी परत आणण्याबाबतही चर्चा झाली.मुख्य सचिवांच्या हस्ते उद्यान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
दौऱ्यादरम्यान त्यांनी कस्तुरबा गांधी निवासी विद्यालय आणि आदिवासी मुलींच्या आश्रमशाळेला भेट दिली. तसेच तुमनूर येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्राची पाहणी केली.विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी शिक्षण आणि उपलब्ध सुविधांची माहिती घेतली.
मुख्य सचिवांनी आशा स्वयंसेविकांशी चर्चा करून त्यांच्या आरोग्यविषयक कामकाजाची आणि अडचणींची माहिती घेतली.तसेच तुमनूर येथील ग्रामपंचायत परिसर आणि फळबागांना भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून ग्रामीण विकासाबाबत त्यांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या.नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा,असेही आवाहन त्यांनी केले.या दौऱ्यात मुख्य सचिवांनी मेडिगड्डा प्रकल्प आणि नगरम येथील पुलाची पाहणी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बेसुमार महागाई; सर्वजण चिडीचूप..! -पुढाऱ्यांची इच्छाशक्तीही खतम..

उद्रेक न्युज वृत्त :-बेसुमार महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडू लागले आहेत.पण,सर्वजण चिडीचूप राहून एखाद्या नाट्य रसिक जणांप्रमाणे उघड्या डोळ्यांवर झालर पांघरून बसलेत.हल्ली शेतमालाचे भाव पडल्यामुळे...

गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत.प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्ग नसलेल्या...

सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचाच व्हॉट्सॲप केला हॅक..!

उद्रेक न्युज वृत्त :-सायबर गुन्हेगार कधी काय करतील याचा नेम नाही.सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या स्टेटसवर...

आजचे मंत्रिमंडळ निर्णय; नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार रोख बक्षीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्रिमंडळाची आज,मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!