Tuesday, November 17, 2026
Homeगडचिरोलीरब्बी हंगामात ज्वारी बियाणे व पीक प्रात्यक्षिकासाठी अनुदान; अर्ज करण्याचे आवाहन..

रब्बी हंगामात ज्वारी बियाणे व पीक प्रात्यक्षिकासाठी अनुदान; अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य घटकासाठी सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामात ज्वारी पीक प्रात्यक्षिके, प्रमाणित बियाणे वितरण आणि बियाणे मिनिकीट वितरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या घटकांचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी,शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
पिकाची उत्पादकता वाढविणे,बियाणे बदलास चालना देणे आणि सुधारित व संकरित वाणांचा प्रसार करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.जिल्ह्यात ज्वारी पीक प्रात्यक्षिकांसाठी २०० हेक्टरचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून,प्रतिएकर ३ हजार रुपये या दराने शंभर टक्के अनुदानाची तरतूद आहे.हा घटक नोंदणीकृत शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांमार्फत राबविण्यात येणार आहे.
प्रमाणित बियाणे वितरणांतर्गत ज्वारीच्या १० वर्षांच्या आतील वाणांसाठी १०० क्विंटल आणि १० वर्षांवरील वाणांसाठी १०० क्विंटल बियाणे वितरणाचे उद्दिष्ट आहे.दहा वर्षांच्या आतील वाणांसाठी बियाण्याच्या किंमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल ३ हजार रुपये,यांपैकी कमी असलेल्या रकमेचे अनुदान मिळेल. दहा वर्षांवरील वाणांसाठी किंमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल १ हजार ५०० रुपये,यांपैकी कमी असलेल्या रकमेचे अनुदान देण्यात येईल.या घटकाचा लाभ प्रतिशेतकरी कमाल एक हेक्टर क्षेत्रापुरता मर्यादित आहे.
याशिवाय,ज्वारीचे प्रत्येकी चार किलो वजनाचे एक हजार बियाणे मिनिकीट १०० टक्के अनुदानावर वितरित करण्यात येणार आहेत.यासाठी एकूण ४० क्विंटल बियाण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रमाणित बियाणे व मिनिकीटचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत.
पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करणारा शेतकरी गट शासनमान्य यंत्रणेकडे ३१ मार्च २०२६ पूर्वी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.सर्व घटकांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी व फार्मर आयडी बंधनकारक आहे. एका कुटुंबातील पती,पत्नी व अविवाहित प्रौढ अपत्य यांपैकी एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल.लाभार्थ्यांची निवड ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे.सन २०२६ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ असल्याने महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
इच्छुकांनी महाडीबीटी पोर्टलच्या “https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin” (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin)या संकेतस्थळावर अर्ज करावेत. प्रमाणित बियाणे वितरणाचा लाभ संबंधित बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत फार्मर आयडीच्या आधारे देण्यात येईल.अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत.प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्ग नसलेल्या...

सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचाच व्हॉट्सॲप केला हॅक..!

उद्रेक न्युज वृत्त :-सायबर गुन्हेगार कधी काय करतील याचा नेम नाही.सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या स्टेटसवर...

आजचे मंत्रिमंडळ निर्णय; नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार रोख बक्षीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्रिमंडळाची आज,मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आमदारांचा दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात.. -एक महिन्याचे वेतन दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांनी आपले एक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!