उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात महायुतीचीच सरकार स्थापन होणार,असे राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या मोठ-मोठ्या दिग्गजांच्या वतीने छातीठोकपणे सांगितले जात होते आणि ते खरेही ठरले आहे.अशातच आता मुख्यमंत्र्याच्या शपथविधीच्या भव्य सोहळ्याची तयारी सुरु झाली असली तरी मुख्यमंत्री कोण? हे मात्र,अद्याप जाहीर झालेले नसल्याने मुहूर्त ठरला.. पण पर्फेक्ट सिलेक्शनच होईना..! असे झाले त्यामुळे याची उलटसुलट चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही टीकात्मक विधाने केली जात आहेत.भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे निश्चित असले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा असली तरीही भाजप आयत्यावेळी धक्कातंत्र वापरु शकतो,हेच या उशीर होण्यामागचे कारण ठरु शकते.शिक्कामोर्तब झालेले नाही; मात्र शपथविधी ५ डिसेंबरला होणार असून त्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.मुंबईच्या आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.या कार्यक्रमाला लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात येणार आहे.तसेच एकूण तब्बल ४० हजार निमंत्रितांची उपस्थिती असेल असे सांगण्यात येत आहे.
मुहूर्त ठरला.. पण पर्फेक्ट सिलेक्शनच होईना..! – भाजप आयत्यावेळी धक्कातंत्र वापरण्याची शक्यता..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES