Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीमार्च महिन्यातील नियमित राशन व आनंदाचा शिधा प्रतिसंचाची उचल करावी

मार्च महिन्यातील नियमित राशन व आनंदाचा शिधा प्रतिसंचाची उचल करावी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील सर्व रेशनकार्डधारकांना सुचित करण्यात आले आहे की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत माहे मार्च २०२३ करिता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू,तांदूळ व साखरेचे नियतन व वाटप परिमाण निश्चित करण्यात आलेले आहे. 

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिका ३० किलो तांदुळ मोफत,गहू ५ किलो मोफत तर १ किलो साखर २० रुपये प्रति किलो प्रमाणे.तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रती व्यक्ती ४ किलो तांदुळ मोफत,१ किलो मोफत,शिधाजन्न संच प्रतिसंच रुपये १०० प्रमाणे मिळणार आहे.शासन पत्र संदर्भ क्र.२ अन्वये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रु.३ रु,प्रतिकिलो तांदूळ-२,प्रतिकिलो गहू व १ प्रतिकिलो भरडधान्य या दराने अन्नधान्य वितरीत करण्यात येणारे ‘अन्नधान्य १ जानेवारी २०२३ ते ३२ डिसेंबर पर्यत एक वर्षाच्या २०२३ कालावधीकरीता अनुज्ञेय असलेले अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना वितरीत करावयाचे आहे.मोफत,नियतनाचा महिना कोणताही असला तरीही सदर अन्नधान्य १ जानेवारी २०२३ पासून मोफत वितरीत करण्याबाबतचे शासन निर्देश प्राप्त आहे.            

तसेच शासन पत्र संदर्भ क्र.३ अन्वये जिल्हयातील रास्तभाव दुकानामार्फतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्नयोजनेतील व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्य ‘’आनंदाचा शिधा ‘’ प्रत्येकी १ किलो रवा,१ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नस संचाचे माहे मार्च २०२३ या महिन्याकरीता ई-पास प्रणालीद्वारे रु.१०० प्रतिसंच या सवलतीच्या दराने वाटप करण्यात येत आहे.

सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना सुचित करण्यात येत की, त्यांना नेमून दिलेल्या रास्तभाव धान्य दुकानात जावून आपले शिधापत्रिकेवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील माहे मार्च २०२३ महिन्यातील नियमित देय असलेल्या  गहू व तांदूळ अन्नधान्याची  मोफत उचल करावी.व धान्य घेतेवेळी पोओएस मशीन मधून निघणारी पावतीवर रास्तभाव दुकानादाराकडून घ्यावी व सोबतच नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त आनंदाचा शिधा रु.१००/- प्रतिसंचची उचल करावी.दुकानात एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे असे जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!