- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर व २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला आहे.अशातच अनेकांना प्रश्न पडतो की,रिझल्ट लागल्या नंतर मतदान केलेल्या ईव्हीएम मशीनचे काय होते? तर
मतदारसंघातील मतमोजणी पार पडल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येतात.२३ नोव्हेंबर रोजी राज्यातील मतमोजणीची प्रक्रिया पूर्णत्वास गेली.त्यानंतर या सर्व मशीन निवडणूक विभागाच्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या समक्ष सील करण्यात आले आहे.त्याचसोबतच अहवाल मोजणी करून निवडणूक विभागालाही पाठविण्यात आला आहे.मतमोजणीबाबत काही आक्षेप आले तर हा डेटा सुरक्षित राहावा म्हणून या ईव्हीएम मशीन सांभाळण्यात येतात.ईव्हीएमबाबत एखाद्याने न्यायालयात याचिका दाखल केली,तर त्यासाठी पुरावा म्हणून डेटा व साहित्य सुरक्षित ठेवावे लागते.
४५ दिवसांपर्यंत न्यायालयात याचिका दाखल करण्याची मुदत असते.त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने डेटा त्या कालावधीपर्यंत सुरक्षित राहावा म्हणून ४५ दिवस तो सांभाळण्यात येतो.यासोबतच तेथील सीसीटीव्ही फुटेज,कागदपत्रे व तत्सम साहित्य सांभाळून ठेवण्यात येते.
- Advertisement -