Wednesday, November 18, 2026
Homeमुंबईमंत्रिमंडळ बैठक; विद्यार्थी,शेतकरी,वाहनधारक, पशुपालक व सहकारी संस्थांबाबत मोठे निर्णय..

मंत्रिमंडळ बैठक; विद्यार्थी,शेतकरी,वाहनधारक, पशुपालक व सहकारी संस्थांबाबत मोठे निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
अध्यक्षतेखाली आज,बुधवार ४ नोव्हेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत विद्यार्थी,शेतकरी,वाहनधारक,पशुपालक, सहकारी संस्था व इतर विभागांशी संबंधित तब्बल १२ मोठे निर्णय घेण्यात आले.विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ करण्यासह वाहनांवरील प्रलंबित दंड भरण्यासाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्याचबरोबर,गोंदिया शहरात लिलावाद्वारे किंवा भाडेतत्त्वावर घरांसाठी देण्यात आलेल्या जमिनींचे विनामूल्य वर्ग एक मध्ये रूपांतर करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली आहे.
  • गृह विभाग👇
नियमभंगामुळे वाहनांवर आकारण्यात आलेल्या प्रलंबित दंडाच्या वसुलीसाठी ‘महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलन अभय योजना-२०२६’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या योजनेंतर्गत प्रलंबित दंडाच्या रकमेवर एकवेळची बाब म्हणून २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.त्यामुळे वाहनधारकांना थकबाकी भरून दंडातून दिलासा मिळवता येणार आहे.
  • इतर मागास बहुजन कल्याण विभाग👇
वसतिगृहात राहणाऱ्या इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात दुपटीहून अधिक वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.यानुसार विभागस्तरीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दरमहा १ हजार ५०० रुपये,तर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना १ हजार ३०० रुपये निर्वाह भत्ता मिळणार आहे.
  • महसूल,नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग👇
नागपूर जिल्ह्यातील बिडगाव-तरोडी(खुर्द)नगर पंचायतीला प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी १ हेक्टर ८६ आर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ही जमीन पांढुर्णा(ता.कामठी)येथील आहे.
  • महसूल,नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग👇
गोंदिया शहरात लिलावाद्वारे किंवा भाडेतत्त्वावर घरांसाठी देण्यात आलेल्या जमिनींचे विनामूल्य वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी.या निर्णयामुळे संबंधित जमीनधारकांना दिलासा मिळणार आहे.
  • पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग👇
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून,ग्रामीण भागातील पशुचिकित्सालयांमध्ये सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.तसेच शेतकरी आणि पशुपालकांना पशुधनाच्या देखभालीसाठी मदत होणार आहे.
  •  विधि व न्याय विभाग👇
पालघर जिल्ह्यातील तलासरी,मोखाडा आणि विक्रमगड येथे ३ ग्राम न्यायालये स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.या न्यायालयांसाठी प्रत्येकी ५,अशी एकूण १५ अनुषंगिक पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच आवश्यक खर्चाच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली आहे.
  • विधि व न्याय विभाग👇
नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या जोड न्यायालयाऐवजी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे नियमित न्यायालय सुरू होणार आहे.या न्यायालयासाठी आवश्यक पदे आणि त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली आहे.
  • महसूल,नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग👇
मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने खरेदी केलेल्या राम मेन्शन इमारतीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.मंदिर परिसराचा विकास आणि भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
  • उच्च व तंत्र शिक्षण विभाग👇
हैदराबाद(सिंध)नॅशनल कॉलेजिएट युनिव्हर्सिटी,मुंबई या समूह विद्यापीठातील कुलाधिकारी पदाचा कार्यकाळ आणि वयोमर्यादेची अट वगळण्यास मंजुरी देण्यात आली आहे.तसेच कुलगुरू पदावरील व्यक्तीला पुनर्नियुक्तीस पात्र ठरविण्यासाठी अधिसूचनेत सुधारणा करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
  • कृषी विभाग👇
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागपूर येथील कृषी महाविद्यालयाच्या दाभा परिसरातील जागेवर आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.या केंद्रासाठी ६४४ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे.
  • सहकार विभाग👇
मुदत संपलेल्या आणि दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित झालेल्या अ वर्गातील १८ सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्त न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,१९६० मधील कलम ७३ अअअ (३)अंतर्गत तरतुदी आणि महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक)नियम,२०१४ मधील नियम ४ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
  •  सहकार विभाग👇
राज्यातील ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांच्या समित्यांवर शासनाकडून ५ सदस्य नियुक्त करण्यात येणार आहेत. यामध्ये सहाय्यक निबंधक दर्जापेक्षा कमी नसलेला एक अधिकारी आणि संस्थेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या चार व्यक्तींचा समावेश असेल.शासकीय अधिकाऱ्याला मतदानाचा अधिकार नसेल,तर इतर चार सदस्यांना संचालक मंडळात मतदानाचा अधिकार असेल.मात्र,त्यांना संस्थेच्या पदाधिकारीपदाच्या निवडणुकीत सहभागी होता येणार नाही.ही सुधारणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना लागू राहणार नाही. यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,१९६० मधील कलम ७३ अअअ (२)मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत.प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्ग नसलेल्या...

सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचाच व्हॉट्सॲप केला हॅक..!

उद्रेक न्युज वृत्त :-सायबर गुन्हेगार कधी काय करतील याचा नेम नाही.सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या स्टेटसवर...

आजचे मंत्रिमंडळ निर्णय; नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार रोख बक्षीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्रिमंडळाची आज,मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आमदारांचा दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात.. -एक महिन्याचे वेतन दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांनी आपले एक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!