- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर
चोरट्यांनी बँकेच्या नावाने फोन केला.त्यानंतर,पेन्शन कार्ड तयार करण्याचे आमिष दाखवले व मोबाईलवर लिंक पाठवली.जशी लिंक उघडली,तसेच धाड-धाड बँक खात्यातून पैसे काढल्याचे दोन मॅसेज आले.पहिला मॅसेज ४ लाख ९० हजाराचा आणि दुसराही मॅसेज ४ लाख ९० हजाराचा असे एकूण ९ लाख ८० हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली.याप्रकरणी नरेंद्र भार्गव काणे वय ६५ वर्षे,रा. रामदासपेठ,नागपूर यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
नरेंद्र काणे यांना काही दिवसांपूर्वी ७३२१९४२२१८ या मोबाइल क्रमांकावरून दुपारी सुमारे चारच्या सुमारास त्यांना फोन आला.फोन करणाऱ्याने आपण बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमधून बोलत असल्याचे सांगितले.ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन कार्ड तयार करण्यात येत असून, त्यासाठी मोबाइलवर पाठविलेल्या लिंकवर आवश्यक माहिती भरावी लागेल,असे त्याने सांगितले.या आमिषाला बळी पडून काणे यांनी मोबाइलवर आलेल्या लिंकवर क्लिक केले.लिंकवर क्लिक करताच बँकेतून रक्कम काढण्यात आल्याचे मोबाइलवर दोन मॅसेज आले. अचानक पैसे काढल्याच्या आलेल्या मॅसेजने काणे हे गोंधळात पडले आणि आर्थिक फटक्याचे बळी ठरले.
लिंकवर क्लिक करताच बँक खात्यातून लाखो रुपये गायब होणे हा एक गंभीर सायबर गुन्हा आहे,ज्याला ‘फिशिंग’ वा ‘स्मिशिंग’ म्हटले जाते.सायबर गुन्हेगार युजर्सना बनावट आणि खोट्या भूलथापा देणाऱ्या लिंक्स पाठवून त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरतात आणि पैसे लंपास करतात.यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.सर्वात आधी तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून तुमचे बँक खाते,डेबिट/क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग सेवा त्वरित ब्लॉक करा. त्याचबरोबर,केंद्रीय सायबर गुन्हे मंत्रालयाच्या १९३० या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित कॉल करून घटनेची नोंद करा.
- Advertisement -

