- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-शहराच्या वर्धमाननगर परिसरातील (लकडगंज)लघुउद्योग परिसरात आज,रविवार १ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास प्लास्टिक बारदानाच्या गोदामाला लागलेल्या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली.गोदामात प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि तयार साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. प्लास्टिक हे अत्यंत ज्वलनशील असल्याने आगीने काही वेळातच भीषण रौद्ररूप धारण केले.गोदामातून मोठ्या प्रमाणात काळा धूर बाहेर पडून परिसरात धुराचे लोट पसरले.दरम्यान, परिसरातील काही नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली.आगीची तीव्रता लक्षात घेता नागपूर अग्निशमन आणि आपत्कालीन सेवेने घटनास्थळी अग्निशमन गाड्या तातडीने पाठवल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी गोदामावर सतत पाणी फवारून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परिसरात प्लास्टिकशी संबंधित अनेक उत्पादन युनिट्स आणि कारखाने असल्याने या परिस्थितीमुळे चिंता वाढली आहे.आग शेजारील औद्योगिक आस्थापनांमध्ये पसरण्याचा धोका असल्याने आग विझवण्याचे कार्य आव्हानात्मक बनले आहे.अग्निशमन दलाचे जवान आवारातून काही तयार माल आणि उत्पादित साहित्य बाहेर काढण्याचाही प्रयत्न करीत आहेत.सध्या अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यावर आणि ती जवळच्या कारखान्यांमध्ये पसरण्यापासून रोखण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली,हे अद्याप स्पष्ट झाले नसून अचानक लागलेल्या आगीमुळे गोदामधारकांचे मोठे नुकसान झाले आहे.
- Advertisement -

