- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-खरीप हंगामातील उभ्या धान पिकात रानडूकरांनी हैदोस घालून मोठ्या प्रमाणावर नासाडी केली होती.रानडुकरांच्या हैदोसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.वन विभागाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या धान पिकांचे एक ते दीड महिन्यापूर्वी पंचनामे करण्यात आले.त्यानंतरही अद्यापपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळाला नसल्याने,नुकसान केले रानडुकरांनी,मात्र महिना लोटूनही नुकसाभरपाईची रक्कम दिलीच नाही लेकरांनी’ असे झाले आहे.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला केव्हा मिळणार? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.
खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड करतात.अशातच जंगलव्याप्त परिसरात रानडुकरांचा मुक्तसंचार दिसून येतो.त्यामुळे धान पीक कापण्याच्या वेळेस किंवा तत्पूर्वी जंगलीडुक्कर अन्न शोधण्याच्या दृष्टीने आपला मोर्चा शेत शिवारात वळवितात.अन्न शोधता-शोधता धानपिकाची नासाडी करतात.खरीप हंगामात रानडुकरांनी हजारो हेक्टर धान पिकांची नासाडी केली आहे.जिल्ह्यातील वन विभागांच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या धान पिकाचे पंचनामे केले असून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
- Advertisement -