- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ.अभिजीत वंजारी यांनी विजयी पताका फडकवत सलग दुसऱ्यांदा आमदार पदाची मोहोर उमटवली.पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक ७५ हजार ४३८ मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही.त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार द्वितीय पसंतीक्रमाची बाद फेरी घेण्यात आली.मात्र,पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये एकूण १ लाख ६५ हजार ९०६ मतांपैकी तब्बल १५ हजार ३२ मते अवैध ठरली. त्यामुळे मतमोजणीत अवैध ठरलेल्या १५ हजार ३२ मतपत्रिकांची पुन्हा तपासणी करावी,अशी मागणी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी केली.मात्र, सदरची मागणी ही निवडणूक प्रशासनाने अमान्य केली.कारण,मतमोजणी प्रक्रियेत संबंधित मतपत्रिका उमेदवारांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात आल्या आणि त्यानंतरच त्या अवैध ठरविण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.त्यामुळे फेरतपासणीसाठी सादर केलेला कोहळे यांचा अर्ज फेटाळण्यात आला.विशेष म्हणजे,मतमोजणीच्या वेळी सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींना संशयास्पद किंवा नियमबाह्य मतपत्रिका दाखविण्यात आल्या होत्या,त्यांची पाहणी केल्यानंतरच संबंधित मते अवैध ठरविण्यात आली होती.या निर्धारित प्रक्रियेचा आधार घेत प्रशासनाने पुन्हा मतपत्रिकांची तपासणी करण्यास नकार दिला.दरम्यान,अवैध ठरलेल्या तब्बल १५ हजार ३२ मतपत्रिकांमध्ये विविध प्रकारच्या चुका आढळल्या.काही मतदारांनी मतपत्रिका कोरी सोडली. तर काहींनी पसंतीक्रम दर्शविणारा अंक लिहिण्याऐवजी ‘राइट’ ची खूण केली.काही मतपत्रिकांवर अंकाभोवती गोल काढण्यात आला होता,तर काहींमध्ये उमेदवाराच्या छायाचित्राजवळ पसंतीक्रम नोंदविण्यात आला होता.त्यामुळे १ लाख ६५ हजार ९०६ मतांपैकी तब्बल १५ हजार ३२ मते अवैध ठरली आणि केवळ १ लाख ५० हजार ८७४ मते वैध ठरविण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे,यापूर्वी पदवीधर मतदारसंघात मतदान केलेल्या बऱ्याच जणांना मतदान कसे करायचे याची कल्पना होती; पण काही नवीन पदवीधर वा ज्यांना कुठलीही माहिती नाही,अशांच्या हातून चूका होणे साहजिकच आहे.कारण जनजागृतीचा अभाव यातून स्पष्टपणे दिसून येतो.
- Advertisement -

