- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली शहर पोलिसांनी धडक कारवाई करीत नवेगाव येथे गांजा विक्री करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळून ३२ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज चव्हाण वय ३० वर्षे व सौरभ रॉय वय २६ वर्षे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नवेगाव परिसरातील दोन युवक गांजा विकत असल्याची माहिती गडचिरोली शहर पोलिसांना मिळाली.त्याआधारे शहर पोलिसांच्या पथकाने नवेगाव परिसरात सापळा रचला.यावेळी सौरभ रॉय आणि राज चव्हाण हे दोन युवक संशयास्पद स्थितीत आढळून आले.पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता ते गांजा विकत असल्याचे स्पष्ट झाले.दोन्ही युवकांना अटक करून त्यांच्याकडून २ हजार ५०० रुपये किंमतीचा १२६ ग्रॅम गांजा आणि ३० हजार रुपये किंमतीची एक दुचाकी असा एकूण ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणी गडचिरोली ठाण्याचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक चैतन्य काटकर व डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सदरची कारवाई केली आहे.
- Advertisement -