Saturday, March 15, 2025
Homeभंडाराधान्य खरेदी केंद्रातील घोटाळ्यात पुन्हा एकाची पडली भर....- चार कोटी नंतर पावणेतीन...
spot_img

धान्य खरेदी केंद्रातील घोटाळ्यात पुन्हा एकाची पडली भर….- चार कोटी नंतर पावणेतीन कोटींचा धान्य खरेदी केंद्रातील घोटाळा…- १५ जणांवर गुन्हे दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा ( तुमसर) :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात खोटे दस्तऐवज तयार करून धान्य खरेदी केंद्रातील अपहार करण्याचे प्रकरण उघडकीस येऊ लागले आहेत.काही दिवसांपूर्वीच याच तालुक्यातील नाकाडोंगरी येथील धान खरेदी केंद्रात सुमारे चार कोटींचा अपहार झाल्याची शाई अजूनर्यंत वाळत नाही तोच पुन्हा; तुमसर तालुक्यातील आंबागड येथे आधारभूत धान खरेदी केंद्रात दोन कोटी ७१ लाख ३४ हजार रुपयांचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी आंधळगाव पोलिस ठाण्यात संबंधिताविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात एकूण १५ जणांचा समावेश असून दोन ग्रेडर यांना अटक करण्यात आली आहे.

अरविंद भगवान दास भुतांगे व स्वप्निल राजेश शामकुवर दोन्ही रा.आंबागड अशी अटक केलेल्या ग्रेडर यांची नावे आहेत.अन्य जणांवर गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये राधेशाम तोलाजी रहांगडाले (अध्यक्ष), संचालक म्हणून गोपीचंद कवळु बावनकर, सुधीर चंदुलाल ठाकरे, संजय फत्तु कावळे, निलकंठ रतिराम मोरे, घनशाम झागडुसाव जांभुळपाने, राजेश सुखराम शामकुवर, नंदलाल डोमाजी रहांगडाले, बुधराज पंढरी पटले, श्रीपत अंतु कोकोडे, गणेश उदेसिंग पंचरे,रत्नमाला  भगवान भुतांगे, सचिव अनिल तोलाजी रहांगडाले तर ग्रेडर अरविंद भगवानदास भुतांगे व स्वप्नील राजेश शामकुवर यांचा समावेश आहे.

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आंबागड,ता.तुमसर या नावाने असलेल्या संस्थेमध्ये असलेल्या १५ जणांनी संगनमत करून आंबागड येथे धान खरेदी केंद्र असलेल्या धान खरेदी हंगाम सन २०२१-२०२२ मध्ये खरीप हंगामाचे प्रत्यक्ष धान खरेदी न करता धान खरेदी केल्याचे खोटे दस्तऐवज तयार केले.

यातून शासनाची व मार्केटिंग फेडरेशन व शेतकऱ्याची दोन कोटी ७१ लाख ३४ हजार ४३८ रुपयांचा अपहार करून फसवणूक केली.जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी आंधळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात पोलिसांनी १५ जणांविरुद्ध भादंविच्या ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन राजकुमार करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!