उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- राष्ट्रीय लोक अदालतींच्या माध्यमातून वादी-प्रतिवादी यांच्यातील वाद समोपचाराने व सलोख्याने मिटविण्याकरीता राष्ट्रीय लोक अदालतींचे आयोजन करण्यात येते.राष्ट्रीय लोक अदालतीत प्रकरणांचा दिवसेंदिवस निपटारा लवकरात-लवकर लागत असल्याने लोकअदालतीत ठेवण्यात येणा-या प्रकरणांची संख्या झपट्याने वाढत चालली आहे.त्यामुळे जनतेचा वेळ,पैसा व मानसिक त्रास वाचविण्याच्या दृषटिकोनातून तालुका विधी सेवा समिती देसाईगंज अंतर्गत खटला पुर्व प्रकरणे नियमित दिवाणी व फौजदारी प्रकरणांत वादी व प्रतिवादी यांच्यातील वाद समोपचार व सलोख्याने मिटविण्यासाठी ११ फेब्रुवारी २०२३ रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय देसाईगंज येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते.सदर लोक अदालतीमध्ये एकुण ४१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला व संपुर्ण प्रकरणांमध्ये रक्कम रुपये १०,११,३८९/- रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये खटलापुर्व २६,नियमित फौजदारी व दिवाणी खटला प्रकरणांमधे १५ प्रकरण असे एकुण ४१ प्रकरणे मिटवून यात एकुण १०,११,३८९/- रुपये वसूल करण्यात आले आहे. राष्ट्रीय लोक अदालतीला पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती.डी.डी.विघ्ने,सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्र.श्रे.चामोर्शी,पॅनल सदस्य अधिवक्ता मोह.तारीक सौदागर,ॲड.संजय गुरु, ॲड.मंगेश शेंडे, ॲड.बी.एम. बांबोळकर,ॲड.लाँगमार्च खोब्रागडे,ॲड.दत्ता पिलारे, अँड प्रमोद बुध्दे व अन्य सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी देसाईगंज न्यायालयातील वित्त;आस्थापना विभागाचे सहाय्यक अधिक्षक ए.एल.आमटे,लघुलेखक व्ही.एस.महल्ले, वरिष्ठ लिपीक चेतन भुर्रे,कनिष्ठ लिपीक प्रविण माटे, कनिष्ठ लिपीक मिलींद तिरमलवार,कनिष्ठ लिपीक श्रीमती एस.यु.गावंडे,कनिष्ठ लिपीक अजय कागदेलवार,कनिष्ठ लिपीक रवि कामटकर,शिपाई पी. के.चालुरकर,शिपाई पुष्पा दासरवार,कारकुन प्रविण मेश्राम आदींनी अथक परिश्रम घेतले.