- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील चक्रवर्ती सम्राट अशोक स्केटिंग ॲकेडमीच्या स्केटर्स विद्यार्थ्यांनी नुकतेच उमरेड येथे झालेल्या एन्डूरन्स नागपूर डिस्ट्रिक्ट स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५-२६ स्पर्धेत सहभाग घेऊन वेगवेगळ्या वयोगटातील २० सेकेंद आणि १ मिनिटाच्या स्पर्धेमध्ये ५ सुवर्ण पदकासह १ रौप्यपदक आणि २ कांस्यपदक असे एकूण ८ पदकाची कमाई करत देसाईगंज शहराला स्केटिंगच्या दुनियेत मानाचे स्थान मिळवून दिले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेमध्ये जेजानी स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेतील कु.सानवी दिनेश राऊत या चिमुकल्या स्केटिंग खेळाडूने ७ वर्षे वयोगटात रोलर्स स्केटिंग २० सेकंद आणि १ मिनिट या दोन्ही स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून दोन सुवर्ण पदकाची कमाई केली.तर कारमेल ॲकॅडमी आमगांव(देसाईगंज)येथील कु.उंशिका मंगेश मस्के हिने १० वर्षे वयोगटात इनलाईन स्केटिंग २० सेकंद आणि १ मिनिट या दोन्ही स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून दोन सुवर्ण पदकाची कमाई केली.तसेच विवांश विवेक जांभुळकर याने १० वर्षे वयोगटात इनलाईन स्केटिंग २० सेकंद आणि १ मिनिट या दोन्ही स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावून दोन कांस्य पदकाची कमाई केली आहे.तसेच निरज हरिलाल दाऊदसारिया याने १४ वर्षे वयोगटात रोलर्स स्केटिंग २० सेकंद आणि १ मिनिट या दोन्ही स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून एक सुवर्णपदक व एक रौप्यपदकाची कमाई केली आहे.
विशेष म्हणजे,जानेवारी-२०२६ मध्ये मुंबई(खोपोली ) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय एन्डूरन्स स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५-२६ मध्ये कु.उंशिका मस्के आणि विवांश जांभूळकर या स्केटर्सची निवड झाली आहे.देसाईगंज शहरातील स्केटर्स यांच्या नेत्रदिपक यशामुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून शाळेसह चक्रवर्ती सम्राट अशोक स्केटिंग ॲकेडमीचे प्रशिक्षक नागेश रामटेके यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
- Advertisement -

