उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत मालांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्याची यावी; यासाठी आपचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवानी व उपस्थित आपच्या पदाधिकऱ्यांनी देसाईगंज तहसीलदार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदाद्वारे मागणी केली आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे.१८ मार्च ते २० मार्च २०२३ रोजी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारपीट व अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.अशातच देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील शेत माल शेतातच सापडल्याने शेतमालाचे नुकसान झाले आहे.अशातच भाजी पाला,कडधान्य,मका,चना,ज्वारी व इतर अश्या अनेक प्रकारच्या शेत मालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अवकाळी पावसामुळे नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी; अशा मागणीचे निवेदन देसाईगंज आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.
निवेदन सादर करतेवेळी देसाईगंज आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष भरत दहलानी, शहराध्यक्ष आशिष घुटके,महिला शहराध्यक्षा शिल्पा बोरकर, देवा जांभूळकर,शेखर बारापात्रे,तबरेज खान व इतर आपचे कार्यकर्ते उपस्थित होते.