Wednesday, November 18, 2026
Homeगडचिरोलीदुचाकीला चारचाकी वाहनाची जोरदार धडक; एकुलत्या एक मुलाचे अपघाती निधन..

दुचाकीला चारचाकी वाहनाची जोरदार धडक; एकुलत्या एक मुलाचे अपघाती निधन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गोगावजवळील यूआयटी महाविद्यालय समोर एका चारचाकी वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने वडिलांच्या मृत्यूनंतर आईचा आधार असलेल्या २९ वर्षीय एकुलत्या एक मुलाचे घटनास्थळीच अपघाती निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.भूषण कोमलदास शेंडे वय २९ वर्षे,रा.गोगाव,ता.जि.गडचिरोली असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून तो अविवाहीत होता. त्याचे वडील कोमलदास शेंडे यांनी काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.त्यामुळे भूषण हा आईसोबत गोगाव येथे वास्तव्यास होता.अश्यातच अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने आईवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
भूषण हा काल रविवारच्या सायंकाळी दुचाकीने गडचिरोलीहून आरमोरी मार्गे असलेल्या गोगाव येथे
जाण्यासाठी निघाला होता.रात्री सात वाजे दरम्यान गोगावजवळील यूआयटी महाविद्यालय जवळ पोहचताच आरमोरीकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की भूषणचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.अपघात  प्रकरणी गोगाव येथील किशोर मांडवगडे यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चारचाकी वाहन चालक नितीन श्रीराम साबे वय ४६ वर्षे,रा.नांदुरा,जि.बुलढाणा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बेसुमार महागाई; सर्वजण चिडीचूप..! -पुढाऱ्यांची इच्छाशक्तीही खतम..

उद्रेक न्युज वृत्त :-बेसुमार महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडू लागले आहेत.पण,सर्वजण चिडीचूप राहून एखाद्या नाट्य रसिक जणांप्रमाणे उघड्या डोळ्यांवर झालर पांघरून बसलेत.हल्ली शेतमालाचे भाव पडल्यामुळे...

गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत.प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्ग नसलेल्या...

सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचाच व्हॉट्सॲप केला हॅक..!

उद्रेक न्युज वृत्त :-सायबर गुन्हेगार कधी काय करतील याचा नेम नाही.सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या स्टेटसवर...

आजचे मंत्रिमंडळ निर्णय; नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार रोख बक्षीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्रिमंडळाची आज,मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!