Wednesday, March 11, 2026
Homeनवी दिल्लीदिल्लीत भूकंपाचे हादरे; नागरिक घराबाहेर निघाले..

दिल्लीत भूकंपाचे हादरे; नागरिक घराबाहेर निघाले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-दिल्लीत आज,सोमवार १७ फेब्रुवारीला सकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे जोरदार हादरे जाणवल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले.भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केलवर असल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने म्हटले आहे. याचे केंद्र दिल्लीच्या जवळ जमिनीपासून ५ किमी खोल होते.यामुळे याचे धक्के अधिक जाणवले.काही सेकंदापर्यंत जमीन हलत राहिल्याने इमारतींच्या आतमध्ये जोरदार कंपन जाणवले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.त्यातच दिल्लीसह जवळपासच्या परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाच्या एक्सवर पोस्ट करत लोकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले.दिल्ली आणि जवळच्या परिसरात भूकंपाचे झटके जाणवल्याने सर्वांना शांत राहण्याचे तसेच योग्य ती सुरक्षा बाळगण्याचे आवाहन केले.अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत,असे त्यांनी म्हटले.
अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंग्र धौला कुआंमध्ये दुर्गाबाई कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनजवळ होता.जिथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता तेथे एक नाला आहे.या परिसरात दर दोन ते तीन वर्षात एखादा लहान आणि कमी तीव्रतेच्या भूकंपाचे झटके बसत असतात. २०१५ मध्ये येथे ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता वाहनचालकांशी उद्धटपणे वागणे आणि दंड भरण्यासाठी सक्ती करणे पोलिसांना पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात प्रलंबित ई-चालान वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.मात्र,या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी पोलीस वाहनचालकांना रस्त्यात अडवून 'दंड आत्ताच भरा,अन्यथा...

सरपण गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला; इसम ठार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जंगल परिसरात सरपण गोळा करीत असतांना वाघाने हल्ला चढवून एका इसमास ठार केल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील...

ऐतिहासिक यश; नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेस ‘आयएसओ’ मानांकन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर या शाळेला आज,बुधवार ११ मार्च रोजी ISO 9001:2015 Quality...

शिक्षकाचे पाच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांनी चपलेने बदडले..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना आज,मंगळवार १० मार्च रोजी उघडकीस आली आहे.एका ५४ वर्षीय शिक्षकाने इयत्ता चौथीच्या पाच विद्यार्थिनींशी अश्लील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!