Wednesday, November 18, 2026
Homeनागपूर'त्या' भाडेकरूचा खतरनाक कारनामा; बनावट नोटा छापून असली नोटांचे झाड उगवण्याची पाहायचा...

‘त्या’ भाडेकरूचा खतरनाक कारनामा; बनावट नोटा छापून असली नोटांचे झाड उगवण्याची पाहायचा स्वप्ने.. -नोटांचे बंडल उशाखाली ठेवून करायचा मंत्रजाप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नुकताच नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवार २४ ऑक्टोंबर २०२६ रोजी एक धक्कादायक प्रकार समोर आला होता.भाड्याने म्हणजेच किरायाने राहत असलेल्या भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.दरम्यान,सदरचा प्रकार उघडकीस येताच भाडेकरू फरार झाला होता.त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले होते व त्याला नुकतीच अटक करण्यात आली.पुष्पम कृष्णा भेंडारकर ऊर्फ बंडाणे वय ३० वर्षे,रा.वर्धमाननगर,नागपूर असे अटकेतील भाडेकरू आरोपीचे नाव असून पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.रात्री उशाशी बनावट नोटा ठेवून झोपायचे आणि पहाटे उठून त्यांची विधिवत पूजा करायची,असा विचित्र दिनक्रम बनावट नोटा छापणाऱ्या आरोपीचा होता.म्हणजेच पैशांचा पाऊस पडण्याची स्वप्ने तो रंगवू लागला होता. पैशांचा पाऊस पाडण्याची कल्पना त्याने यूट्यूबवरील व्हिडीओतून घेतल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.घरात अधिक पैसा ठेवल्यास आणखी पैसा आकर्षित होईल,मंत्रजाप आणि प्रार्थनेतून आर्थिक चमत्कार घडेल,या समजुतीतून त्याने पाचशे रुपयांच्या नोटांसारख्या प्रतिमा छापल्या.त्यांचे बंडल उशाखाली ठेवून तो मंत्रजाप करायचा.पोलीस कारवाई झाली नसती तर बनावट नोटा जमिनीत खड्डा करून पुरण्याची त्याची तयारी होती.त्या ठिकाणी रोज खतपाणी घातल्यास असली नोटांचे झाड उगवेल, असा त्याला विश्वास होता. मात्र,पैशांचा पाऊस पडण्याऐवजी त्याची रवानगी थेट पोलिस कोठडीत झाली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
  • असा झाला भांडाफोड👇
बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला पुष्पम नियमित कामधंदा करीत नव्हता.त्याचा पूर्वी रेशन दुकानाचा व्यवसाय होता.मात्र,व्यवसाय बंद पडल्यानंतर त्याने आर्थिक अडचणींचा सामना केला.दोन वर्षापूर्वी पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर तो वेगळ्याच विश्वात रमला. त्याने घरातील सोनेही गहाण ठेवले होते.बँकेत आधीपासून जमा असलेल्या जुन्या उत्पन्नाच्या आधारे त्याचा उदरनिर्वाह सुरू होता.अश्यातच एकांतात राहून विनाशकाले विपरीत बुद्धी त्याला सुचली.दीड वर्षापूर्वी त्याने खरबीतील चैतन्येश्वरनगर येथे राहणारे ५५ वर्षीय रमेश गंगाधर हरडे यांच्याकडे खोली भाड्याने घेतली. यूट्यूबवर विविध व्हिडिओ पाहत असतांना पैसा आणि आर्थिक समृद्धीशी संबंधित मजकूर त्याच्या पाहण्यात आला.त्यानंतर त्याने या विषयावरील आणखी व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली.मनातील इच्छा दृढपणे व्यक्त केल्यास ती पूर्ण होऊ शकते,या संकल्पनेने तो प्रभावित झाला होता. घरात अधिक पैसा ठेवल्यास आणखी पैसा आकर्षित होईल,असा समज त्याच्या मनात दृढ झाला. याच विचारातून त्याने ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातून रंगीत छपाई यंत्र घेतले व छपाईसाठी कागद नागपूरच्या महाल परिसरातून आणले.त्यानंतर,रंगीत छपाई यंत्राच्या साहाय्याने पाचशे रुपयांच्या नोटांसारख्या प्रतिमा कागदांवर छापण्यास सुरुवात केली.तब्बल ३७ लाख रुपयांच्या बनावट नोटा छापून छापील कागदांचे बंडल तयार करून तो उशाखाली ठेवायचा.त्यानंतर मंत्रजाप आणि प्रार्थना करून आर्थिक चमत्काराची प्रतीक्षा करायचा.मात्र,त्याच्या अपेक्षेप्रमाणे काहीही घडले नाही. दरम्यान,पुष्पमने दोन महिन्यांचे भाडे थकवल्याने घरमालक रमेश हरडे हे भाडे मागण्यासाठी त्याच्याकडे गेले असता खोली बंद दिसली.त्यामुळे हरडे यांनी खोलीचे कुलूप काढून आत बघताच संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बेसुमार महागाई; सर्वजण चिडीचूप..! -पुढाऱ्यांची इच्छाशक्तीही खतम..

उद्रेक न्युज वृत्त :-बेसुमार महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडू लागले आहेत.पण,सर्वजण चिडीचूप राहून एखाद्या नाट्य रसिक जणांप्रमाणे उघड्या डोळ्यांवर झालर पांघरून बसलेत.हल्ली शेतमालाचे भाव पडल्यामुळे...

गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत.प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्ग नसलेल्या...

सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचाच व्हॉट्सॲप केला हॅक..!

उद्रेक न्युज वृत्त :-सायबर गुन्हेगार कधी काय करतील याचा नेम नाही.सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या स्टेटसवर...

आजचे मंत्रिमंडळ निर्णय; नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार रोख बक्षीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्रिमंडळाची आज,मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!