- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी (चंद्रपूर):-ब्रम्हपुरी तालुक्यातील आरमोरी- गांगलवाडी रोडलगत असलेल्या वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काल, शुक्रवारी दिनांक-६ सप्टेंबर रोजी उघडीस आली. समीर सोमेश्वर राऊत, वय २४ वर्षे रा.हडदा असे मृताचे नाव आहे.तरुण हा गुरवारपासून बेपत्ता होता. दरम्यान,आरमोरी-गांगलवाडी रोडलगत त्याची चप्पल व साहित्य आढळून आल्याने तरुणाने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची संशय बळावला होता. याबाबत ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.दुसऱ्या दिवशी त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळला.पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालात पाठिवला.घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस करीत आहेत.
- Advertisement -