- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जमावबंदी आदेश लागू असतांना आंदोलन वा इतर बाबी करतांना प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते.मात्र,भंडारा नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले खरी,पण प्रशासनाची कुठल्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता वैनगंगा नदीपात्रातील स्मशानभूमीजवळ एकत्र येऊन आंदोलन केल्याने तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून भंडारा पोलिसांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसह दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भंडारा नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याने तीन दिवसांपूर्वी कर्मचारी व त्यांचे प्रतिनिधी वैनगंगा नदीपात्रातील स्मशानभूमीजवळ एकत्र आले होते.यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले.या आंदोलनासाठी प्रशासन किंवा पोलिस विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश जानबा वाडिवा यांच्या निदर्शनास आले.विनापरवानगी जमाव करून सार्वजनिक शांततेचा भंग करणे,तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सफाई कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -

