Monday, December 15, 2025
Homeदेसाईगंजजंगली हत्तींचा कळप देसाईगंजच्या विहीरगाव, डोंगरगाव जंगल परिसरात.. - नागरिकांनी जंगल परिसरात...

जंगली हत्तींचा कळप देसाईगंजच्या विहीरगाव, डोंगरगाव जंगल परिसरात.. – नागरिकांनी जंगल परिसरात जाऊ नये- वपअ धोंडणे

- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-ओडिसा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या जंगली(रानटी) हत्तींनी जणूकाही जिल्ह्यातील जंगलांचा ताबाच घेतलेला आहे; असे वाटत आहे.गेल्या तीन वर्षांपासून जंगली हत्ती जिल्ह्यातील वेगवेगळ्या वन विभागात भ्रमंती करीत आहेत.जंगली हत्तींनी जंगल परिसराला आपले अधिवास बनवले आहे.कुठे महिनाभर तर कुठे पंधरा दिवस राहून परत पुन्हा घुमजाव करीत शेतकऱ्यांच्या विविध पिकांची नासधूस करून इकडून तिकडे आणि तिकडून इकडे,असे करतांना दिसून येतात.जंगली हत्तींमुळे वन विभागासह शेतकरी बांधव ‘हत्ती आले रे पळा-पळा’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.अश्यातच पोर्ला वन परिक्षेत्रात तीन महिने उपद्रव माजविणाऱ्या जंगली हत्तींनी देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव,डोंगरगाव व पिंपळगाव परिसरात एंट्री केल्याने शेतकरी तथा परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.त्यातच वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी काल,रविवार १७ मे पासून जंगली हत्तींच्या हालचालींवर पाळत ठेवून आहेत.वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, देसाईगंज तालुक्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींच्या कळपात जवळपास २० ते २५ हत्ती असून त्यावर दोन दिवसांपासून पाळत सुरू आहे.सध्या देसाईगंज तालुक्यात जंगली हत्तींनी एंट्री केल्याने भ्रमंती करीत असतांना हत्तींकडून वाटेत येणारी घरे आणि शेतपिकांचे नुकसान होऊ नये,याची खबरदारी घेण्यात येत आहे.

 

कैलास धोंडणे,वन परिक्षेत्र अधिकारी देसाईगंज👇

आम्ही वन विभागाच्या संपूर्ण टीमसह हत्तींवर पाळत ठेवून आहोत.खबरदारी म्हणून नागरिकांनी जंगल परिसरात जाऊ नये,हत्ती नजरेस पडल्यास दगड मारणे वा त्यांना हिनवू नये.हत्तींच्या हालचालींवर  वनविभागाची करडी नजर असून परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!